प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:33 IST2021-01-18T04:33:20+5:302021-01-18T04:33:20+5:30

प्रभारी गटशिक्षणाधिकारी मस्के हे गडचिरोली येथून ये-जा करतात. तसेच कार्यालयीन वेळेच्या आधीच निघून जातात. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित ...

Demand for removal of group education officer in charge | प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी

प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी

प्रभारी गटशिक्षणाधिकारी मस्के हे गडचिरोली येथून ये-जा करतात. तसेच कार्यालयीन वेळेच्या आधीच निघून जातात. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण न होता दिवसेंदिवस समस्या वाढतच आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणार्थ जावे तरी कुठे? हा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांवर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई प्रस्तावित करून त्यांना जिल्हा परिषदेत नेमावे, अन्यथा प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार शिक्षक संघटनेने दिला आहे. यासंदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले.

Web Title: Demand for removal of group education officer in charge