गोदामाअभावी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:34+5:302021-06-06T04:27:34+5:30

रबी पणन हंगाम २०२०-२१ करिता उन्हाळी धान खरेदीकरिता जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या सूचनेनुसार खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी सातबारा, नमुना-८ ...

Delay in starting grain procurement center due to lack of godown | गोदामाअभावी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब

गोदामाअभावी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब

रबी पणन हंगाम २०२०-२१ करिता उन्हाळी धान खरेदीकरिता जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या सूचनेनुसार खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी सातबारा, नमुना-८ अ, आधारकार्ड व बँक पासबुकची झेराॅक्स जमा केली. मात्र, खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब होत असल्याने अनेक गरजू व आर्थिक चणचण असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी आपले धान अतिशय अल्प म्हणजे बाराशे ते तेराशे रुपये क्विंटल भावाने खासगी व्यापाऱ्यांना विकले. काही जण अद्यापही विक्री करीत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. धानाची साठवणूक करून ठेवण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनकडे स्वतःची गोदाम व्यवस्था नाही. शिवाय भाड्याने गोदाम उपलब्ध होत नसल्याने धानाची खरेदी सुरू करण्यात आली नाही. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे यांची विचारणा केली असता एक-दाेन दिवसात धान खरेदी केंद्र सुरू हाेईल, अशी माहिती त्यांनी दिली.

बाॅक्स

मका खरेदीबाबत हालचाली नाही

आरमोरी तालुक्यात जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली असून मागील वर्षीच्या तुलनेत तालुक्यात पाचपटीने मक्याचे क्षेत्र वाढले. मागील वर्षी आधारभूत भावाने मक्याची खरेदी करण्यात आली हाेती. त्यामुळे जिल्ह्याच्या इतर भागातही यंदा मक्याची लागवड शेतकऱ्यांनी केली. मात्र, यावर्षी मक्याची हमीभावाने खरेदी करण्यास अद्यापही कुठलेच आदेश आले नाही. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

Web Title: Delay in starting grain procurement center due to lack of godown