न्यायालयाने आपल्याला पूर्णपणे दोषमुक्त केले

By Admin | Updated: July 20, 2015 01:51 IST2015-07-20T01:51:43+5:302015-07-20T01:51:43+5:30

आपल्या संस्थेमार्फत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सिकलसेल प्रकल्प राबविण्यात आला. या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा खोटा आरोप करून नारायण जांभुळे यांनी ....

The court acquitted you completely | न्यायालयाने आपल्याला पूर्णपणे दोषमुक्त केले

न्यायालयाने आपल्याला पूर्णपणे दोषमुक्त केले

सिकलसेल प्रकरण : देवराव होळी यांची माहिती
गडचिरोली : आपल्या संस्थेमार्फत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सिकलसेल प्रकल्प राबविण्यात आला. या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा खोटा आरोप करून नारायण जांभुळे यांनी माझ्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने या संदर्भात माझ्या बाजुने निर्णय दिला असून मला या प्रकरणात पूर्णपणे दोषमुक्त केले आहे, अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नारायण जांभुळे यांना पाठीशी धरून जिल्हा परिषदेचे काही विरोधी पक्षाचे पदाधिकारी आपली नाहक बदनामी करीत आहेत. सदर बदनामी न थांबविल्यास तसेच जनतेमध्ये माझ्याप्रती गैरसमज पसरविल्यास भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन त्यांना धडा शिकविणार असाही इशारा आ. डॉ. देवराव होळी यांनी यावेळी दिला. माझ्या राजीनाम्याबाबत नारायण जांभुळे यांनी न्यायालयात याचिका टाकली असून सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला भाजपाचे पदाधिकारी प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार व प्रकाश अर्जुनवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आपण आ. डॉ. देवराव होळी यांची कुठल्याही प्रकारे बदनामी केली नाही. त्यांच्या व माझ्यात कायदा व न्यायाची लढाई आहे. चामोर्शी रूग्णालयातील त्यांच्या दैनंदिन उपस्थिती रजिस्टरवरील खाडाखोड प्रकरणाची आपण आरोग्य संचालक, मुख्यमंत्री यांच्याकडे विभागीय चौकशीची मागणी केली आहे.
- अ‍ॅड. नारायण जांभुळे, नागपूर

Web Title: The court acquitted you completely