कोरचीत ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी

By Admin | Updated: May 29, 2015 01:13 IST2015-05-29T01:13:30+5:302015-05-29T01:13:30+5:30

येथील हनुमान मंदिरात कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘अच्छे दिन’ ची प्रथम पुण्यतिथी मंगळवारी साजरी केली.

Correct 'good day' death anniversary | कोरचीत ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी

कोरचीत ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी

काँग्रेसचा कार्यक्रम : नागरिकांना बुरे दिन आल्याचा आरोप
कोरची : येथील हनुमान मंदिरात कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘अच्छे दिन’ ची प्रथम पुण्यतिथी मंगळवारी साजरी केली.
यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शामलाल मडावी, सदरू भामानी, मेघराम जमकातन, शालिकराम कराडे, हकीमुद्दीन शेख, शीतल नैताम, रामदास कुमरे, मनोजकुमार अग्रवाल, जीवन भैसारे, हर्षलता भैसारे, शामलाल नैताम, शेंडे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. या आश्वासनांना बळी पडून देशातील जनतेने भाजपाच्या हातात देशाची सत्ता सोपविली. एक वर्षाचा कालावधी उलटला असला तरी अजूनपर्यंत यामध्ये जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. उलट जनता व शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. याचा विरोध करण्यासाठी ‘अच्छे दिन’ ची पुण्यतिथी कोरची येथे साजरी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Correct 'good day' death anniversary