शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पावसाने नाल्यावरील पूल तुटल्याने महामंडळाची बससेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:27 AM

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने अनेक मार्ग व मार्गावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. एटापल्ली-जारावंडी मार्गावरील कांदळी नाल्यावरील पूल तुटल्याने सदर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएटापल्ली-जारावंडी मार्गाची दुरवस्था । आवागमनासाठी नागरिकांपुढे अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने अनेक मार्ग व मार्गावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. एटापल्ली-जारावंडी मार्गावरील कांदळी नाल्यावरील पूल तुटल्याने सदर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली आहे.एटापल्ली तालुका मुख्यालयापासून जारावंडीचे अंतर ५५ किमी आहे. एटापल्ली-जारावंडी मार्गावरील डांबरीकरण उखडून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. मार्गाच्या दुरवस्थेमुळे सदर मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली होती. सदर मार्गाचे नुतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे. मात्र शासनाचे या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे.यावर्षी कसनसूर ते जारावंडीपर्यंत काही मार्गाचे नुतनीकरण करण्यात आले. मार्गाच्या दुरूस्तीनंतर बंद असलेली बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली. सदर मार्गावर अहेरी ते एटापल्ली-जारावंडी मार्गे गडचिरोली अशा दररोज दोन बसफेºया सुरू होत्या. तसेच गडचिरोली-कसनसूर ही बसफेरी सुरू होती. सदर बस कसनसूर येथे मुक्कामी असायचे. परंतु चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने सदर मार्गावरील कांदळी नाल्यावरील पूल तुटला. त्यामुळे सदर मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे.एटापल्ली तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक डांबरी व खडीकरण रस्त्याची वाट लागली आहे. बुजविलेले खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत. अनेक ठिकाणच्या छोट्या पुलानजीकची माती वाहून गेली आहे. एकूणच आवागमनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकstate transportएसटी