शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.होळी यांना ‘सर्वोच्च’ दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सन २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून गडचिरोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक ...

ठळक मुद्देसंडे अँकर । आमदारकी ठरविली वैध; नागपूर खंडपीठाचा निर्णय फेटाळला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून गडचिरोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढलेले डॉ.देवराव होळी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांची आमदारकी वैध ठरविली आहे. २०१४ ते २०१९ या काळातील डॉ.होळी यांची आमदारकी रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.२०१४ मध्ये सरकारी नोकरीचा त्याग करून डॉ.होळी यांनी भाजपकडून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविली होती. यात ते ५० हजाराहून अधिक मताधिक्क्याने विजयी झाले होते. परंतु त्यांचा सरकारी नोकरीचा राजीनामा मंजूर नसतानाही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली, त्यामुळे त्यांची उमेदवारी अनधिकृत असून त्यांची आमदारकी रद्द करावी याकरिता भाकपचे उमेदवार नारायण जांभुळे यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर २०१७ मध्ये नागपूर खंडपीठाने डॉ.होळी यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाला होळी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०२० रोजी याबाबत अंतिम निर्णय देताना नागपूर खंडपीठाने त्यांची आमदारकी रद्द करण्याबाबत दिलेला निर्णय फेटाळून लावला. शनिवारी (दि.२९) यासंदर्भातील कागदपत्रे डॉ.होळी यांच्याकडे उपलब्ध झाली. त्यांच्या वतीने अ‍ॅड.सत्यपाल जैन, सहकारी वकिल गणेश खानझोडे व मनीष शर्मा यांनी काम पाहिले.सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आपली बदनामी करणाऱ्या सर्व विरोधकांना जबर धक्का आहे. आपल्या खºया अर्थाने आज न्याय मिळाला असून या निर्णयामुळे जनतेचा न्यायालयीन प्रक्रि येवरील विश्वास आणखी मजबूत होईल. असत्याची बाजू कितीही बलवान ठरत असली तरी अंतिम विजय हा सत्याचाच होतो.- डॉ.देवराव होळी,आमदार, गडचिरोली मतदार संघ

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळी