नागरिकता मूल्य जागृती अभियान

By Admin | Updated: July 26, 2015 02:44 IST2015-07-26T02:44:16+5:302015-07-26T02:44:16+5:30

सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, गडचिरोली यांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी स्थानिक पत्रकार ...

Citizenship Cost Awareness Campaign | नागरिकता मूल्य जागृती अभियान

नागरिकता मूल्य जागृती अभियान

मार्गदर्शन : सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचा उपक्रम
गडचिरोली : सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, गडचिरोली यांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी स्थानिक पत्रकार भवनात नागरिकता मूल्य जागृती अभियान व ‘अवेक इंडिया’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नरेन गेडाम, अ‍ॅड. भूपेन रायपूरे, प्रा. डॉ. सुरेश डोहणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना नरेन गेडाम यांनी नागरिकांना नागरिकत्वाची, त्यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव होणे हेच खरे जाणीव जागृृतीचे लक्षण आहे. जो पर्यंत या देशातील सामान्य मानसाला त्यांचे संवैधानिक आणि नागरी अधिकार कळणार नाही तो पर्यंत नागरिकता मूल्य प्रस्थापित होणार नाही, असे प्रतिपादन केले. अ‍ॅड भूपेन रायपुरे यांनी नागरिकत्वाची मूलभूत संकल्पना स्पष्ट केली. कायदेशीर व संवैधानिक पैलुुंवर प्रकाश टाकला. प्रा. डॉ. सुरेश डोहणे यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया व त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. संवैधानिक अधिकार नागरिकांना मिळाले पाहिजे यासाठी सुशिक्षित नागरिकांनी जनजागृती मोहीम हाती घ्यावी, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम रामटेके, संचालन धर्मानंद मेश्राम तर आभार काका गडकरी यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक आले होते.

Web Title: Citizenship Cost Awareness Campaign