शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठ्याच्या समस्येने ग्रस्त नागरिक झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

वीज समस्येला घेऊन कोटगूल भागातील ४० वर नागरिकांनी कोटगूल येथील विद्युत विभागाच्या उपकेंद्र कार्यालयावर सोमवारी धडक दिली. दरम्यान उपअभियंता पवार यांना निवेदन देऊन सदर समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, कोटगूल भागातील वीज सेवा सुरळीत करण्यासाठी नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअभियंत्यांशी चर्चा : मुरूमगावच्या उपकेंद्र कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : कोरची तालुक्याच्या कोटगूल व धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव भागात गेल्या काही महिन्यांपासून खंडित वीज पुरवठा तसेच वीज पुरवठ्याच्या लपंडावाची समस्या बिकट झाली आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी कोटगूल येथील नागरिकांनी केली आहे.वीज समस्येला घेऊन कोटगूल भागातील ४० वर नागरिकांनी कोटगूल येथील विद्युत विभागाच्या उपकेंद्र कार्यालयावर सोमवारी धडक दिली. दरम्यान उपअभियंता पवार यांना निवेदन देऊन सदर समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, कोटगूल भागातील वीज सेवा सुरळीत करण्यासाठी नवीन डीपी बसविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने दुर्गम भागातील नागरिकांना योग्य सेवा मिळत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.गेल्या तीन महिन्यांपासून मुरूमगाव उपकेंद्रात उपअभियंत्याची नियुक्ती करण्यात आली नाही. यापूर्वी येथील उपअभियंता पुनेश्वर मेश्राम यांची बदली झाली तेव्हापासून या भागातील सेवा वाऱ्यावर आहे. या ठिकाणी नवीन अभियंता येण्यापूर्वी बदली झालेल्या अभियंता मेश्राम यांना भारमुक्त करण्यात आले. त्यामुळे मुरूमगाव येथे अभियंत्याचे पद रिक्त आहे. यासंदर्भात कोटगूल भागातील नागरिकांनी यापूर्वी चक्काजमा आंदोलन केले होते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन दिले. मात्र आश्वासनाच्या पलिकडे कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या भागातील नागरिक प्रशासनाच्या कारभारावर नाराज आहेत.मुरूमगाव उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा व दुरूस्तीचे काम योग्यरित्या केले जात नाही. कुलभट्टी, कटेझरी भागात लाईनमनची नियुक्ती करण्यात आली. मात्र सदर लाईनमनचे गेल्या चार महिन्यांपासून लोकांना दर्शन होत नसल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.सावरगाव भागासाठी ठाकरे नामक लाईनमनची नियुक्ती करण्यात आली. मात्र सदर लाईनमन धानोरावरून सावरगाव येथे ये-जा करतात. मुख्यालयी राहत नाही. ग्यरापत्ती भागातही अशीच समस्या आहे. एकूणच कोटगूल भागातील वीज समस्येकडे वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.निवेदन देताना कोटगूलचे सरपंच राजेश नैताम, कोसमीचे सरपंच प्रेमसिंग हलामी, कोटगूलचे उपसरपंच झुलफीफार खेतानी, प्रमेशर लोहंबरे, चंद्रशेखर कुमरे, हेमंत कुमरे, नरेश शांडिल, शेखर हलामी, केवळराम टेंभूर्णे आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.-तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणारकोरची व धानोरा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील खंडित वीज पुरवठ्याची तसेच लपंडावाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावी. अभियंत्याची पदे भरण्यात यावी. लाईनमनला मुख्यालयी ठेवण्यात यावे, आदी मागण्या निकाली काढाव्या, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, असा इशारा कोटगूल भागातील सरपंच, उपसरपंचासह ५० नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाºयांनी तसेच लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन वीज पुरवठ्याची समस्या मार्गी काढावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :electricityवीज