शौचालयाच्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 24, 2015 02:34 IST2015-06-24T02:34:58+5:302015-06-24T02:34:58+5:30

येथून १५ किमी अंतरावरील चिंतलपेठ येथे चार वर्षीय बालकांचा शौचालयाच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २२ जून रोजी घडली.

Child's death by lying in toilets | शौचालयाच्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

शौचालयाच्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

चिंतलपेठ येथील घटना : नागरिकांचा बीडीओंना चार तास घेराव
अहेरी : येथून १५ किमी अंतरावरील चिंतलपेठ येथे चार वर्षीय बालकांचा शौचालयाच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २२ जून रोजी घडली. तब्बल चार महिन्यांपासून सदर खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. परंतु पंचायत समितीकडून अनुदान देण्यात आले नसल्याने काम सुरू करण्यात आले नव्हते. याच खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त झाले असून या प्रकरणी दोषींवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खड्ड्यात पडून मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव नयन प्रविण दुर्गे (४) असे आहे. या बालकाच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी एस. एम. तडस, सहायक संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर, विस्तार अधिकारी काळबांधे, मनेरगाचे प्रमुख किशोर वाळके, खमनचेरू ग्रा.पं.च्या सचिव संध्या गेडाम यांना चार तास घेराव करण्यात आला. त्यानंतर संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर वातावरणातील तणाव निवळला. घटनेच्या दिवशी मृतक बालकाचे वडील प्रविण दुर्गे व त्याची आई घराच्या पुढे सेवाग्रामच्या दवाखाण्यातून आलेल्या आपल्या नातेवाईकासोबत चर्चा करीत होते. १५ मिनिटाच्या अवधीत नयन डोळ्यासमोरून गेला. त्यानंतर आईवडिलांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो दिसला नाही व त्याचा खड्ड्यात पडून अंतच झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहेरी येथून प्रा. किशोर बुरबुरे, प्रकाश दुर्गे, सुरेंद्र अलोणे, जावेद अली आदींनी संवर्ग विकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना घेऊन चिंतलपेठ गाठले. (प्रतिनिधी)

Web Title: Child's death by lying in toilets