बालविकास कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था

By Admin | Updated: July 23, 2015 01:26 IST2015-07-23T01:26:38+5:302015-07-23T01:26:38+5:30

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेले अहेरी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे.

Child development office building disturbance | बालविकास कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था

बालविकास कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था

अहेरीतील वास्तव : वाहनही नादुरूस्त
अहेरी : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिनस्त असलेले अहेरी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. सदर इमारतीवरील कवेलू वादळाने उडून कोसळले आहेत. त्यामुळे दमदार पाऊस झाल्यास कार्यालयात पाणी गळते. मात्र या इमारतीच्या दुरूस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
या कार्यालयाला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी देण्यात आलेले वाहन गेल्या दोन महिन्यांपासून नादुरूस्त स्थितीत आहे. परिणामी येथील प्रकल्प अधिकाऱ्यांचे तालुक्यात दौरे बंद झाले आहेत. अहेरीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत जवळपास एकूण १८० अंगणवाड्यांचा समावेश आहे. अहेरी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असून दुर्गम भागात अनेक गावे आहेत. या गावांमध्ये अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांना दौरे करण्याची गरज आहे. मात्र या कार्यालयाचे वाहन नादुरूस्त स्थितीत असल्याने प्रकल्प अधिकाऱ्यांचे दौरे बंद झाले आहे. इमारत व वाहनाची दुरूस्ती करावी, अशी मागणी रघुनाथ तलांडे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Child development office building disturbance