विविध उपक्रमांनी पत्रकार दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:01+5:302021-01-09T04:30:01+5:30

कुरखेडा - येथे तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बंडू लांजेवार यांनी ...

Celebrate Journalist Day with various activities | विविध उपक्रमांनी पत्रकार दिन साजरा

विविध उपक्रमांनी पत्रकार दिन साजरा

कुरखेडा - येथे तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बंडू लांजेवार यांनी आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात केली. यावेळी संघटनेचे सचिव नासिर हाशमी, प्रा.विनाेद नागपूरकर, सिराज पठाण, कृष्णा चाैधरी, रूपेंद्र सेंगर, गीतेश जांभुळे उपस्थित हाेते.

आलापल्ली - येथील वनविश्रामगृहात पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ठेपाले, सचिव शंकर मेश्राम, आशिफ पठाण, मिलींद खाेंड, स्वप्नील तावाडे, सुनील तुरकर, उमेश पेंड्याला, इसरार शेख, रफिक पठाण व सदस्य उपस्थित हाेते.

धानाेरा - येथे तालुका पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ग्रामीण रुग्णालयात रुग्ण व नातेवाईकांना फळ, बिस्कीट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला संघटनेचे घनश्याम म्हशाखेत्री, सुरेश क्षिरसागर, तुफान उंदीरवाडे, रितेश म्हशाखेत्री, अभय इंदुरकर उपस्थित हाेते.

चामाेर्शी - येथे आचार्य बाहशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली. चामाेर्शी पत्रकार समितीतर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष लाेमेश बुरांडे हाेते. यावेळी सचिव कालिदास बन्साेड, सहसचिव चंदू कुनघाडकर, काेषाध्यक्ष अय्याज शेख, सदस्य अरविंद अवताडे, अमित साखरे, गजानन बारसागडे उपस्थित हाेते. उपस्थित मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

Web Title: Celebrate Journalist Day with various activities