शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुरांनी लावली रहदारीची ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

अंकिसा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा व छत्तीसगड राज्याला जोडतो. त्यामुळे २४ तास येथून वाहनांची वर्दळ असते. विशेषत: अवजड वाहनांची रहदारी अधिक असते. परंतु सकाळ व सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी येतात. प्रसंगी अपघातसुद्धा घडू शकतो.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील स्थिती : व्यावसायिकांनी दुकानांसमोर केले बांबूचे कुंपण

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी मोकाट जनावरांच्या हैैदोसाचा सामना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना करावा लागतो. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वत्र सारखीच स्थिती असते. मात्र अंकिसा परिसरात याहून स्थिती अधिक बिकट आहे. येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आधीच वाहनांची प्रचंड वर्दळ असताना मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. काही दिवसांपासून येथे मोकाट जनावरांनी हैैदोस घातल्याने रहदारीची ‘वाट’ लागली आहे. संरक्षणासाठी अनेक दुकानदारांना प्रतिष्ठाणासमोर बांबूचे कुंपण करावे लागले आहे.अंकिसा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा व छत्तीसगड राज्याला जोडतो. त्यामुळे २४ तास येथून वाहनांची वर्दळ असते. विशेषत: अवजड वाहनांची रहदारी अधिक असते. परंतु सकाळ व सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी येतात. प्रसंगी अपघातसुद्धा घडू शकतो. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत ग्रामीण स्तरावर काहीच उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे मोकाट जनावरे रस्त्यावरून गिरट्या घालत असतात.गावातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या सभोवताल बांबूंचे कुंपण करून बंदोबस्त केला आहे. मोकाट जनावरांपासून त्यांच्या मालाचे संरक्षण होत असले तरी इतरांचे काय? असा सवाल होत आहे.दुर्घटना घडल्यास जबाबदारी कुणाची?अंकिसा येथील महामार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशास्थितीत येथे मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. ग्रामीण भागात दिवसेंदिवस गुराख्यांची टंचाई भासत असल्याने जनावरे मोकाट राहतात. परिणामी अनेक शेतकरी अनावश्यक जनावरे कसायांना विक्री करतात.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा