शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अकरा महिन्यांपासून बुरुड कामगार बांबूपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : आरमोरी व देसाईगंज येथील बांबू कामगारांना मागील ११ महिन्यांपासून हिरव्या बांबूचा पुरवठा करण्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरमोरी : आरमोरी व देसाईगंज येथील बांबू कामगारांना मागील ११ महिन्यांपासून हिरव्या बांबूचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे बांबूपासून विविध उपयोगी वस्तू बनवून त्यातून मिळालेल्या पैशांवर आपली चूल पेटवून मुलाबाळांना खाऊ घालणाऱ्या बुरुड कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.

आरमोरी व देसाईगंज तालुक्यात जवळपास ६०० बुरुड समाजाचे कुटुंब आहेत. हे सर्व कुटुंब बांबूच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. बांबूपासून विविध उपयोगी वस्तू तयार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, मागील ११ महिन्यांपासून कामगारांना वनविभागाकडून हिरव्या बांबूचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे बुरुड कामगारांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. बांबू कामगारांचे सर्वस्वी जीवन बांबूवर अवलंबून असल्यामुळे आपल्या कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात बांबूचे माेठ्या प्रमाणात उत्पादन होत असून पेसाअंतर्गत वन समितीला बांबू काढण्याचे आणि विक्री करण्याचे हक्क दिले आहेत. वन समितीद्वारा जास्त किमतीने पेपर मिलला बांबू पाठविला जातो. त्यामुळेच बांबू कामगाराना बांबू पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. बुरुड कामगारांनी बांबूसाठी आता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालून आम्हाला हिरव्या बांबूचा पुरवठा करून आमची उपासमार थांबवा, अशी मागणी केली आहे. बुरुड समाज बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष मधुकर बोरकर, सचिव ज्ञानदेव हिरापुरे, दिलीप हिरापुरे, नेपाल नागपुरे, देवेंद्र हिरापुरे, नरेश हिरापुरे, चंद्रशेखर नागपुरे, सुशील बोरकर, गोमा गराडे, निशांत हिरापुरे आदींनी केली आहे.

बाॅक्स...

बुरूड समाजासाठी १० टक्के बांबू राखीव ठेवा

वनविभागाने पेसा अंतर्गत मोडणारा बांबू बुरुड कामगारांकरिता १० टक्के राखीब ठेऊन तो देण्यात यावा, याकरिता बुरुड समाज बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले. परंतु अजूनपर्यंत बांबू कामगारांच्या मागणीचा विचार करण्यात आलेला नाही. उपवनसंरक्षक व आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनाही वारंवार निवेदन देण्यात आले. परंतु बांबू कामगारांना बांबूचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे बांबू कामगारांवर आर्थिक संकट ओढवले आहे.