शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

१० कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ५० गावांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:25 IST

वैरागड येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय असून यात ठिकाणी एक कनिष्ठ अभियंता आणि आठ-दहा वर्षांपूर्वी २३ कर्मचारी कार्यरत होते ...

वैरागड येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय असून यात ठिकाणी एक कनिष्ठ अभियंता आणि आठ-दहा वर्षांपूर्वी २३ कर्मचारी कार्यरत होते पण मागील १० वर्षात या कार्यालयात कार्यरत काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर काहींच्या या ठिकाणाहून बदल्या झाल्या, त्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या नाही. वर्षभरापूर्वी येथील कार्यालयात कनिष्ठ अभियंता एम. एच. भवरे यांची बदली झाली तेव्हापासून वैरागड मंडळ कार्यालयाचा भार आरमोरी येथील अभियंत्यांकडे दिला आहे. पण दुसऱ्या कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असल्याने ते वैरागड कार्यालयात फार अल्प वेळ हजर राहत असल्यामुळे विद्युत ग्राहकाचे बरेच काम रेंगाळले आहेत.

या वीज मंडळाच्या कार्यक्षेत्रात वैरागड, मोहझरी, सुकाळा, नागरवाही, शिवनी, मानापूर, देलनवाडी, मांगदा, कोसरी, कुलीकुली, पिसेवडधा, कुरडी, डोंगरतमासी, वडेगाव, मेंढा, व भाकरोंडी परिसरातील अनेक गावांचा समावेश असून प्रत्येक गावातील वीज ग्राहकांची मोठी संख्या, कृषिपंप धारक शेतकरी आणि वारंवार विजेचा लपंडाव, कमी विद्युत दाब यामुळे नागरिकांच्या बऱ्याच समस्या असतात. गावाप्रमाणे नेमून दिलेले वीज कर्मचारी हे ग्राहकांच्या तक्रारीनुसार तांत्रिक अडचणी पूर्ण करतात पण कार्यालयीन अडचणी वीज ग्राहक कृषिपंप धारक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आरमोरी कार्यालयात पायपीट करावी लागत आहे. वैरागड कार्यालयात कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नसल्याने ग्राहकांना आल्यापावली समस्यांना सोडवता गावी परतावे लागत आहे.

वैरागड कार्यालयातील कनिष्ठ अभियंता आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वीज ग्राहकांचे आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून ही होणारी अडचण टाळण्यासाठी वैरागड वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिक कर्मचारी आणि वर्षभरापासून रिक्त असलेले कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.