नाभिक महामंडळाच्या बैठकीत विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST2021-01-13T05:36:12+5:302021-01-13T05:36:12+5:30

गडचिरोली : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखेची बैठक ९ जानेवारीला स्थानिक श्री संत नगाजी महाराज देवस्थानात पार पडली. या ...

Brainstorming at the meeting of the Nuclear Corporation | नाभिक महामंडळाच्या बैठकीत विचारमंथन

नाभिक महामंडळाच्या बैठकीत विचारमंथन

गडचिरोली : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखेची बैठक ९ जानेवारीला स्थानिक श्री संत नगाजी महाराज देवस्थानात पार पडली. या बैठकीत समाजाच्या अनेक प्रश्नांवर तसेच महामंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबाबत विचारमंथन व चर्चा करण्यात आली.

बैठकीला महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास पाटील, विदर्भ विभाग अध्यक्ष श्याम आसकरकर, उपाध्यक्ष रमेश लाकूडकर, नागपूर शहराध्यक्ष गणपत चौधरी, नागपूर विभागाचे उपाध्यक्ष नामदेव शेंडे, जिल्हाध्यक्ष तुषार चोपकार, संत नगाजी महाराज देवस्थान कमिटीचे सचिव रमेश नक्षिणे, मिननाथ पगाडे, दुधराम महागणकार, नरेंद्र नागापुरे, माधव नागापुरे, करण फुलबांधे,आरमोरी तालुका सचिव सुनील फुलबांधे, सहसचिव सतीश जांपलवार, सदस्य कालिदास लक्षणे, राजेंद्र चोपकर, धानोरा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वनस्कर उपस्थित होते.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे आरमोरी तालुकाध्यक्ष बाळकृष्ण चोपकार यांच्या निधनाबद्दल बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच समाजातील समस्या व इतर संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन जिल्हा सचिव रुपेश भंडारे तर शहराध्यक्ष हरिष कडुकार यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी सहकार्य केले.

Web Title: Brainstorming at the meeting of the Nuclear Corporation