शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोघांनी गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

कुरखेडा ते कोरची-देवरी या मार्गावर नियमित प्रवासी घेऊन चालणारी काळी-पिवळी जीप शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवरीवरून प्रवासी घेऊन कोरचीकडे येण्यासाठी निघाली होती. मसेली, बोडेना गावाजवळील वळणावर दुपारचे १ वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. दरम्यान त्या ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकी वाहनावरील दोन युवकांनी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी काळीपिवळी वाहनाची दुचाकीला (एमएच ३६, आर ३२८३) जबर धडक बसली.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : एका ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील दोन युवकांना समोरून येणाऱ्या काळीपिवळी जीपची जबर धडक बसली. यात दोघांनाही जागेवरच प्राण गमवावे लागले. हा अपघात कोरचीपासून सहा किलोमीटरवर असलेल्या बोडेना गावसमोरील वळणावर शुक्रवारच्या दुपारी झाला.प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा ते कोरची-देवरी या मार्गावर नियमित प्रवासी घेऊन चालणारी काळी-पिवळी जीप शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवरीवरून प्रवासी घेऊन कोरचीकडे येण्यासाठी निघाली होती. मसेली, बोडेना गावाजवळील वळणावर दुपारचे १ वाजताच्या सुमारास विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. दरम्यान त्या ट्रकच्या मागे असलेल्या दुचाकी वाहनावरील दोन युवकांनी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी काळीपिवळी वाहनाची दुचाकीला (एमएच ३६, आर ३२८३) जबर धडक बसली. त्यात नीलकुमार रावजी आचले (२३ वर्षे) आणि प्रकाश बुधराम हिडामी (३१ वर्षे), दोघेही रा. फुलगोंदी हे रस्त्यालगत फेकल्या जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती मिळताच कोरची पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक समाधान फडोड, हवालदार रामलाल हिडामी, पोलीस शिपाई विष्णू उरकुडे घटनास्थळी दाखल झाले. 

दुचाकी फरफटत गेलीट्रकच्या मागून पुढे जाण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकीची काळीपिवळीला समोरासमोर जबर धडक बसली. यावेळी दुचाकी काळीपिवळीच्या बंपरला अडकली आणि दुचाकीला फरफटत नेत काळीपिवळी गाडीही रस्त्याखाली उतरली. दुचाकीस्वार निलकुमारची कंबर व हातपाय मोडले असून छातीलाही जबर मार लागला. मागे बसलेल्या प्रकाशच्या डोक्याला जबर मार लागला. 

हेल्मेट असते तर...या अपघातातील दोन्ही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यातील प्रकाश हिडामी याचा मृत्यू तर डोक्याला मार लागूनच झाला. त्यामुळे त्याने जर डोक्यात हेल्मेट घातलेले असते तर त्याचा जीव वाचला असता हे स्पष्ट होते. तो विवाहित असून त्याला दोन मुली, एक मुलगा व पत्नी तसेच आई-वडील आहेत. हे कुटुंब उघड्यावर पडले.

 

टॅग्स :Accidentअपघात