सिराेंचात ३५ नागरिकांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:34 IST2021-04-19T04:34:01+5:302021-04-19T04:34:01+5:30

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशात गंभीर रुग्णांना, गर्भवती महिलांना ...

Blood donation of 35 citizens in Siran | सिराेंचात ३५ नागरिकांचे रक्तदान

सिराेंचात ३५ नागरिकांचे रक्तदान

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशात गंभीर रुग्णांना, गर्भवती महिलांना रक्ताची गरज भासू शकते. मात्र, रुग्णांची वाढती संख्या व रक्तपेढीत रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेऊन धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिरोंचा तथा ग्रामपंचायत जानमपल्लीच्या वतीने सिरोंचा येथील भगवंतराव कला महाविद्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जाेपासली. शिबिरात विशेष अतिथी म्हणून जि. प. सदस्य भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, राकाँ. महिला विभागाच्या शाहीन हकीम, राकाँचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, महिला तालुकाध्यक्ष मनीषा चल्लावार, तालुका सचिव एम.डी. शानू उपस्थित हाेते. याप्रसंगी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व मास्कचे वितरण करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी देवया येनगंदुला, नागराज गणपती, नागेश गागापुरपू, दीपक दुर्गे, सपना मुरकुटे, संजीव रेड्डी यांनी सहकार्य केले.

===Photopath===

180421\18gad_5_18042021_30.jpg

===Caption===

रक्तदान करताना युवती, साेबत जि.प. सदस्य भाग्यश्री आत्राम व अन्य.

Web Title: Blood donation of 35 citizens in Siran