भामरागडातील कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बंदच

By Admin | Updated: June 19, 2015 01:34 IST2015-06-19T01:34:03+5:302015-06-19T01:34:03+5:30

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात कर्मचारी १५ दिवस ते एक महिना सतत गैरहजर राहत असल्याचा प्रकार दिसून येत आहे.

Bimetramic machine in Bhamragad office closed | भामरागडातील कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बंदच

भामरागडातील कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बंदच

भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात कर्मचारी १५ दिवस ते एक महिना सतत गैरहजर राहत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या नियमित हजेरीकरिता अनेक कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविलेल्या आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सोडले तर बऱ्याच कार्यालयात ही बायोमेट्रिक मशीन बंद पडलेली आहे. भामरागड येथील ग्रामीण रूग्णालय, तहसील कार्यालय, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय, वन परिक्षेत्र कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, उपकोषागार कार्यालय, डाक कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र यामध्ये मशीन बंद असल्याचे दिसून येते. अनेक कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीही कार्यालयात हजर राहत नाही. बरेचवेळा शुक्रवारी कार्यालय रिकामे होऊन जाते व सोमवारीही अनेक कार्यालयात कर्मचारी रात्री सायंकाळपर्यंत पोहोचतात. असा प्रकार नियमितपणे सुरू आहे. या प्रकारावर आळा घालण्याची गरज असून कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे काम अडकून राहतात. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bimetramic machine in Bhamragad office closed