शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड तालुका समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: May 11, 2017 01:54 IST

तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांची

आरोग्य व्यवस्था बळकट करा : लालसू नोगोटी यांचे जि.प. सीईओंना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क भामरागड : तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी जि. प. सदस्य अ‍ॅड. लालसू नोगोटी यांनी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवारी अ‍ॅड. लालसू नोगोटी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांची भेट घेऊन आरोग्यविषयक समस्यांबाबत दीर्घ चर्चा केली. अ‍ॅड.नोगोटी यांनी सांगितले की, भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ. जामी यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तत्काळ भरा, अन्यथा रुग्णालयाला कुलूप ठोकू, असा इशारा नागरिकांनी आंदोलनाद्वारे दिला होता. आंदोलनानंतर मन्नेराजाराम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. भूषण चौधरी व एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ. वानखेडे यांना भामरागड येथे तात्पुरत्या स्वरुपात रुजू करुन घेण्यात आले. परंतु मूळ मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे अ‍ॅड. नोगोटी यांनी गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले. भामरागड तालुक्यात एकूण ५ मानसेवी वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतु ते मुख्यालयी न राहता प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणीच राहतात. अनेक गावे दुर्गम असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेता आणख्ी ५ मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी अ‍ॅड.नोगोटी यांनी केली. यावर गोयल यांनी सकारात्मक आश्वासन दिले.