आविकाचे प्रश्न बाेर्डाच्या बैठकीत मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:33 IST2021-01-18T04:33:24+5:302021-01-18T04:33:24+5:30

कुरखेडा : नाशिक येथे हाेणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत आविका संस्थांचे, पदाधिकारी व व्यवस्थापकांचे विविध प्रश्न पाेटतिडकीने मांडणार असल्याचे आश्वासन आदिवासी ...

Avika's questions will be raised in the meeting of the board | आविकाचे प्रश्न बाेर्डाच्या बैठकीत मांडणार

आविकाचे प्रश्न बाेर्डाच्या बैठकीत मांडणार

कुरखेडा : नाशिक येथे हाेणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत आविका संस्थांचे, पदाधिकारी व व्यवस्थापकांचे विविध प्रश्न पाेटतिडकीने मांडणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरत दुधनाग यांनी दिले.

तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापक यांनी १६ जानेवारीला देवरी येथे संचालक भरतलाल दुधनाग यांची भेट घेतली. यावेळी संस्थेच्या अडचणींबाबत दुधनाग यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी आविका संस्थेचे उपाध्यक्ष चांगदेव फाये, विनोद खुणे, माधव तलमले, हेमंत सेंदरे, महेंद्र मेश्राम, नरेंद्र पटणे, लीलाधर घोसेकर, रूपेश मठ्ठे, वसंतराव हटवार आदी उपस्थित होते.

यावेळी सन २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीमधील महामंडळाकडे राखून ठेवलेले मंडी चार्जेस व कमिशन देण्यात यावे, सन २०२०-२१मधील मंडी चार्जेस व कमिशन दरमहा देण्यात यावे, चालू खरेदीमध्ये १ लाख अग्रिम रक्कम घ्यावी, मागील हंगामामधील शेतकऱ्यांची बारदान्याची रक्कम द्यावी व चालू हंगामात आवश्यक बारदाना देण्यात यावी, वनपट्टेधारक शेतकरी यांचे धान खरेदी करण्यातील अडचणी दूर कराव्या, शासन निर्णयनुसार धान्याची वेळेत उचल होत नसल्याने १ टक्के घटतूट अट रद्द करावी, आविका संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा महामंडळामध्ये समावेश करावा, आदी मागण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

Web Title: Avika's questions will be raised in the meeting of the board