‘लाल दहशती’ला आणखी हादरा; १०८ माओवाद्यांचे आत्मसमर्पण! आधुनिक शस्त्रांसह सोने,३.३० कोटींची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 06:01 IST2026-03-12T06:01:19+5:302026-03-12T06:01:39+5:30

छत्तीसगडमधील बस्तरमध्ये माओवाद्यांच्या मुळावर घाव घालण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे.

Another blow to 'Red Terror'; 108 Maoists surrender! Gold, cash worth Rs 3.30 crore seized along with modern weapons | ‘लाल दहशती’ला आणखी हादरा; १०८ माओवाद्यांचे आत्मसमर्पण! आधुनिक शस्त्रांसह सोने,३.३० कोटींची रोकड जप्त

‘लाल दहशती’ला आणखी हादरा; १०८ माओवाद्यांचे आत्मसमर्पण! आधुनिक शस्त्रांसह सोने,३.३० कोटींची रोकड जप्त

गडचिरोली : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये माओवाद्यांच्या मुळावर घाव घालण्यात सुरक्षा दलांना मोठे यश आले आहे. मंगळवारी ‘पुनर्वसन ते पुनरुत्थान’ या मोहिमेंतर्गत तब्बल १०८ माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामूहिक आत्मसमर्पण केले. या सर्वांवर सुमारे ४ कोटींचे बक्षीस होते. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांकडून अत्याधुनिक शस्त्रे, एक किलो सोने आणि ३.३० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

जगदलपूर येथील पोलिस समन्वय केंद्र ‘शौर्य भवन’ येथे दुपारी दोन वाजता हा ऐतिहासिक आत्मसमर्पण सोहळा पार पडला. बस्तरमधील ‘दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी’ला हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

आत्मसमर्पण केलेले जहाल माओवादी... : बिजापूर : ३७, दंतेवाडा : ३०, सुकमा : १८, बस्तर : १६, नारायणपूर : ०४, कांकेर : ०३ अशी जिल्हानिहाय संख्या आहे.

सरकारच्या धोरणाचा प्रभाव

बस्तरमध्ये सध्या माओवाद्यांविरुद्ध ‘ऑपरेशन प्रहार’ आणि इतर मोहिमा तीव्र करण्यात आल्या आहेत. एकीकडे दबाव वाढत असतानाच दुसरीकडे सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे माओवादी मोठ्या संख्येने मुख्य प्रवाहात येत आहेत. 

Web Title : नक्सलवाद को बड़ा झटका: हथियारों और नकदी के साथ 108 माओवादियों का आत्मसमर्पण

Web Summary : 'पुनर्वास से पुनरुत्थान' अभियान के तहत छत्तीसगढ़ के बस्तर में 108 माओवादियों ने आत्मसमर्पण किया। सुरक्षा बलों ने हथियार, सोना और 3.3 करोड़ रुपये जब्त किए। ऑपरेशन प्रहार और पुनर्वास नीतियों के कारण दंडकारण्य स्पेशल जोनल कमेटी के लिए यह एक बड़ा झटका है।

Web Title : Major Blow to Naxalism: 108 Maoists Surrender with Arms, Cash

Web Summary : 108 Maoists surrendered in Bastar, Chhattisgarh under the 'Rehabilitation to Resurgence' campaign. Security forces seized weapons, gold, and ₹3.3 crore. This massive surrender is a setback for the Dandakaranya Special Zonal Committee due to Operation Prahar and rehabilitation policies.