शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त गावकऱ्यांनी कमलापूर पीएचसीला ठोकले कुलूप

By admin | Updated: October 29, 2016 01:46 IST

अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार याच ठिकाणी कार्यरत डॉ. डोंगरे यांच्याकडे देण्यात यावा,

आंदोलनाचा इशारा : डोंगरे यांच्याकडे प्रभार देण्याची मागणीकमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार याच ठिकाणी कार्यरत डॉ. डोंगरे यांच्याकडे देण्यात यावा, या मागणीसाठी कमलापूरवासीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला शुक्रवारी कुलूप ठोकले. कमलापूर येथील एमबीबीएस डॉक्टर मामीडवार यांची प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यात बदली केली. नवीन एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती होईपर्यंत त्यांना भारमुक्त करू नये, असे निवेदन जिल्हा आरोग्य विभागाला गावकऱ्यांनी दिले होते. तरीही प्रशासनाने १ आॅक्टोबर रोजी त्यांना भारमुक्त केले व कमलापूर पीएचसीचा प्रभार राजाराम येथील डॉ. मानकर यांच्याकडे देण्यात आला. मात्र डॉ.मानकर हे यापूर्वी कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात होते. त्यांची वागणूक येथील नागरिकांना आवडली नाही. त्यामुळे कमलापूर पीएचसीचा प्रभार डॉ. मानकर यांच्याकडे देऊ नये, तर कमलापूर येथेच गट ‘ब’ वैद्यकीय अधिकारी म्हणून मागील अनेक दिवसांपासून कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. डोंगरे यांच्याकडे देण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. परिणामी संतप्त गावकऱ्यांनी पीएचसीला कुलूप ठोकले. यावेळी सीताराम मडावी, महेश मडावी, संतोष ताटीकोंडावर, बोंदयालू गड्डम, कोडापे, साईनाथ पब्बावार आदी उपस्थित होते. डॉ. डोंगरे यांच्याकडे प्रभार न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कमलापूरवासीयांनी दिला आहे. (वार्ताहर)