शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली वाहनासह दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

एका स्कॉर्पिओ वाहनातून तेलंगणा राज्य निर्मित इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ७२० बाटल्या येत असताना त्या वाहनाला पकडण्यात आल्या. दुसऱ्या कारवाईत १०० लिटर हातभट्टीची मोहादारू आणि इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ९० मिलीच्या ९५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवायांमध्ये १ लाख ३० हजार रुपयांची दारू आणि वाहने मिळून एकूण ७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देतेलंगणातून आयात । सात लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्या मार्गाने तेलंगणा व इतर भागातून येणाऱ्या दारू आयातीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी शनिवारी पहाटे राबविलेल्या धाडसत्रात एका चारचाकी वाहनासह दोन दुचाकी आणि त्यातून आणली जाणारी विदेशी व हातभट्टीची दारू जप्त केली. या कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.सदर कारवाया गडचिरोली आणि मुलचेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आल्या. एका स्कॉर्पिओ वाहनातून तेलंगणा राज्य निर्मित इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ७२० बाटल्या येत असताना त्या वाहनाला पकडण्यात आल्या. दुसऱ्या कारवाईत १०० लिटर हातभट्टीची मोहादारू आणि इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ९० मिलीच्या ९५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवायांमध्ये १ लाख ३० हजार रुपयांची दारू आणि वाहने मिळून एकूण ७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी सुब्रत सतानत गाईन, सुनील रुषीजी कन्नाके दोघेही रा.नवेगाव (गडचिरोली), प्रकाश सोमाजी भोयर रा.गिलगाव ता.चामोर्शी, राहुल विनायक पिट्टलवार रा.रामनगर, गडचिरोली आणि आशिष माणिक खोबे रा.गिलगाव ता.चामोर्शी या पाच जणांना अटक करण्यात आली. तर अमोल उमाजी खोबे रा.गिलगाव हा फरार आहे.सदर कारवाया राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक एन.एस. धुरड, दुय्यम निरीक्षक सी.एम.खारोडे, के.एन. देवरे, सहायक दु.निरीक्षक जी.पी. गजभिये, एस.एम.गव्हारे, व्ही.पी.शेंदरे, व्ही.पी. महाकुलकर आदींनी केल्या.

टॅग्स :liquor banदारूबंदी