'नीट'मध्ये एआयची एंट्री ! गडचिरोलीत मोबाइलच्या मदतीने उत्तरे शोधणारा कॉपीबहाद्दर जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:09 IST2026-05-05T15:05:20+5:302026-05-05T15:09:20+5:30

Gadchiroli : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेतलेल्या 'नीट'मध्ये शहरात दोन केंद्रांवर हायटेक कॉपीचे खळबळजनक प्रकार ३ मे रोजी उघडकीस आले आहेत.

AI's entry in 'NEET'! Copy-cat who searched for answers with the help of mobile in Gadchiroli caught | 'नीट'मध्ये एआयची एंट्री ! गडचिरोलीत मोबाइलच्या मदतीने उत्तरे शोधणारा कॉपीबहाद्दर जाळ्यात

AI's entry in 'NEET'! Copy-cat who searched for answers with the help of mobile in Gadchiroli caught

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेतलेल्या 'नीट'मध्ये शहरात दोन केंद्रांवर हायटेक कॉपीचे खळबळजनक प्रकार ३ मे रोजी उघडकीस आले आहेत. कडक सुरक्षा यंत्रणा आणि तपासणीला बगल देऊन दोन विद्यार्थी थेट परीक्षा केंद्रात मोबाइल घेऊन शिरले. चक्क एआयच्या मदतीने प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या एका विद्यार्थ्यासह एका विद्यार्थिनीवर गडचिरोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर (क्र. ३१२५१०२) एकूण ३६० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती. परीक्षा सुरू असताना दुपारी ३:४०च्या सुमारास खोली क्र. ६मधील पर्यवेक्षक राजेश पाटील आणि राखी मुधोळकर यांना चंद्रपूरच्या नागभिड येथील २० वर्षीय विद्यार्थिनीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तिची तपासणी केली असता, आकाशी रंगाचा मोबाइल मिळून आला. धक्कादायक म्हणजे, तिने यावर्षीचा पेपर आपल्या वस्त्रात लपवून ठेवला होता आणि जुन्या वर्षाचा पेपर मुख्य पृष्ठाला जोडून कॉपी करण्याची तयारी केली होती.

'त्याने' एआयला प्रश्न पाठवून लिहिली उत्तरे

शहरातील गोकुळनगरातील शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर (क्र. ३१२५१०१) आष्टी येथील १७ वर्षीय परीक्षेत मोबाइल घेऊन बसला होता. दुपारी २:२७च्या सुमारास पर्यवेक्षक मनीष बानबले यांनी त्याला मोबाइलसह पकडले. परीक्षेची वेळ संपल्यानंतर मोबाइलची तपासणी केली असता, गॅलरीमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळून आले. विशेष म्हणजे, त्याने एआयला प्रश्न पाठवून उत्तरे मिळवल्याचे चॅटिंगवरून स्पष्ट झाले आहे.

तपासणीनंतरही मोबाइल आत कसाः

'नीट'साठी चप्पल, दागिने, केसांच्या पिना अशा साध्या वस्तूंनाही मनाई असताना, हे विद्यार्थी मोबाइल घेऊन आत शिरलेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रप्रमुख राजकुमार नंदागवळी अरुण मुनघाडे यांनी गडचिरोली ठाण्यात तक्रार दिली. 'सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४'मधील कलम ३ (viii) आणि इतर कलमान्वये गुन्हे नोंद झाले. जप्त केलेले मोबाइल आणि चित्रीकरण पुढील तपासासाठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या रॅकेटमध्ये आणर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सहायक अधीक्षक हिरडे हे करत आहेत. 

Web Title : NEET में एआई से धोखाधड़ी: गडचिरोली में मोबाइल के साथ छात्र पकड़े गए

Web Summary : गडचिरोली में दो छात्र NEET परीक्षा में मोबाइल और एआई का उपयोग करके धोखाधड़ी करते हुए पकड़े गए। उन्होंने परीक्षा केंद्रों पर सुरक्षा को दरकिनार कर दिया, जिससे पुलिस जांच शुरू हो गई और परीक्षा की अखंडता के बारे में चिंता बढ़ गई।

Web Title : AI Cheating in NEET Exam: Gadchiroli Students Caught with Mobiles

Web Summary : Two Gadchiroli students were caught using mobiles and AI to cheat during the NEET exam. They bypassed security at exam centers, prompting police investigation and highlighting concerns about exam integrity.