लोकमतच्या वृत्ताने जागे झाले अहेरीचे पाणीपुरवठा कार्यालय

By Admin | Updated: July 24, 2015 01:34 IST2015-07-24T01:34:50+5:302015-07-24T01:34:50+5:30

अहेरी येथील उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात केंद्रीय माहिती अधिकार २००५ अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या माहिती ...

Aheri water supply office awakened by Lokmat's report | लोकमतच्या वृत्ताने जागे झाले अहेरीचे पाणीपुरवठा कार्यालय

लोकमतच्या वृत्ताने जागे झाले अहेरीचे पाणीपुरवठा कार्यालय

अहेरी : अहेरी येथील उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात केंद्रीय माहिती अधिकार २००५ अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या माहिती अधिकाऱ्यांची नाव बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांचीच मागील एक वर्षापासून झळकत होती. या संदर्भात २२ जुलै रोजी ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केल्यावर ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जाग आली. व त्यांनी तत्काळ नव्या तीन अधिकाऱ्यांची नावे एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या फलकावर झळकाविली. त्यामुळे आता नागरिकांना या कार्यालयात माहिती अधिकाराचा अर्ज कोणाकडे द्यायचा याबाबत योग्य माहिती उपलब्ध होणार आहे.

Web Title: Aheri water supply office awakened by Lokmat's report