शेतकऱ्यांच्या बांधावर पाेहाेचून कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले लागवड तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST2021-07-11T04:25:12+5:302021-07-11T04:25:12+5:30

कृषी विभागाच्या वतीने जून महिन्यापासून कृषी सप्ताह, कृषी संजीवनी मोहीम, राबवून याद्वारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ...

After seeing the farmers' dams, the agriculture officials explained the cultivation techniques | शेतकऱ्यांच्या बांधावर पाेहाेचून कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले लागवड तंत्र

शेतकऱ्यांच्या बांधावर पाेहाेचून कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले लागवड तंत्र

कृषी विभागाच्या वतीने जून महिन्यापासून कृषी सप्ताह, कृषी संजीवनी मोहीम, राबवून याद्वारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी विभाग पोहोचला. हे आता रोवणी सुरू झाली असल्याने तालुका कृषी अधिकारी तेजदीप ढगे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरी पद्धत, पट्टा पद्धतीने रोवणी व कमी कालावधीची रोपे लागवड केल्यामुळे उत्पन्नात वाढ कशी होते, याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. सोबतच आपल्या चमूला प्रत्येक गावात कशा पद्धतीने मार्गदर्शन होईल, याचे नियोजन केले आहे. ९ कृषी सहायक व २ कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून विस्तार कार्य जोमात सुरू आहे. त्याची शहानिशा करण्यासाठी देलोडा खुर्द येथे स्वतः तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन मार्गदर्शन केले. सोबत कृषी पर्यवेक्षक जी.एन. जाधवर व कृषी सहायक पी. जे. मेश्राम उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बोरी चक, वडधा, कुरंजा, देलोडा बु. येथे जाऊन शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे महत्त्व सांगितले. शेतीच्या बांधावर तूर लागवड केलेल्या तुरीचे शेंडे खुडल्याने उत्पन्नात दीड ते दोनपट वाढ होते, असेही ते म्हणाले.

बाॅक्स

तणनाशकाबाबत चुकीचा समज

तणनाशकाविषयी शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे. तणनाशक फवारल्यानंतर खते द्यावीत, तणनाशकामुळे खताची भाप जाते, हा चुकीचा समज आहे. धान रोवणी करताना चिखलणीच्या वेळी पहिला तास टाकल्यानंतर खते द्यावीत. त्यानंतर दुसरा तास टाकावा. यामुळे खते मुळांच्या कक्षेत जातील. पाणी व हवेत ते उडून जाणार नाहीत. खताची ३० ते ४० टक्के बचत होईल, असा सल्लाही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला.

100721\img-20210708-wa0046.jpg

देलोडा (बु) येथील शेतावर पोहचून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी

Web Title: After seeing the farmers' dams, the agriculture officials explained the cultivation techniques