शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांना अभिवादन करून ते चढले बाेहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

पाथरगोटा येथील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. यादव राऊत यांच्या मुलीचे लग्न २७ एप्रिल रोजी पार पडले. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार अंगीकारून महापुरुषांच्या कार्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी याेगदान दिले. मुलीच्या लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान देण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : समाजसुधारकांच्या वैचारिक चळवळीत काम करणाऱ्या पित्याच्या कन्येच्या लग्न समारंभात फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्यावतीने वधू पित्याचा सत्कार करण्यात आला. विशेष या लग्नात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करूनच वर-वधू बाेहल्यावर चढले. त्यानंतर हिंदू विवाह पद्धतीनुसार मंगलाष्टके म्हणून विवाह पार पाडण्यात आला. पाथरगोटा येथील ओबीसी प्रवर्गातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. यादव राऊत यांच्या मुलीचे लग्न २७ एप्रिल रोजी पार पडले. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार अंगीकारून महापुरुषांच्या कार्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी याेगदान दिले. मुलीच्या लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान देण्यात आले. बाेहल्यावर चढण्यापूर्वी वधू-वरांना महात्म्याच्या प्रतिमांना दीप प्रज्वलित करून अभिवादन करूनच लग्न मंगलाष्टके म्हणण्यात आले. हिंदू विवाह पद्धतीच्या लग्नात भारतीय थोर पुढाऱ्यांच्या प्रतिमांची भर पडल्यामुळे सायंकाळच्या शांततापूर्ण वातावरणातून विवाह सोहळ्यात आणखीनच आनंदाची भर पडली. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचाच्यावतीने या लग्नसमारंभात वधू पित्याचा शाल, सन्मानचिन्ह, शिवाजी व सम्राट अशोकाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वर-वधू कडील हजारो वऱ्हाडी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ घुटके, भीमराव मेश्राम, दिलीप घोडाम आदींनी सत्कार केला.

वऱ्हाड्यांची हजेरीसदर लग्नसाेहळ्यात वऱ्हाडी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. काेराेना संकट दूर झाल्याने शासन व प्रशासनाच्या वतीने निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे आता दूरवरचे वऱ्हाडी लग्नाला हजेरी लावत आहेत. पाथरगाेटा येथील लग्नसमारंभात उपवर-वधूंसह सर्वांनिच महापुरूषांना अभिवादन केले. या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे. 

 

टॅग्स :marriageलग्न