वकिलाची कार जळाली

By Admin | Updated: April 6, 2017 01:35 IST2017-04-06T01:35:53+5:302017-04-06T01:35:53+5:30

कॉम्प्लेक्स परिसरातील चंद्रपूर मार्गावरील जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारत परिसरात बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास

Advocates burnt the lawyer | वकिलाची कार जळाली

वकिलाची कार जळाली

बघ्यांची गर्दी : जिल्हा न्यायालय परिसरातील घटना
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील चंद्रपूर मार्गावरील जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारत परिसरात बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अ‍ॅड. लिलाधर डेकाटे यांची कार जळाल्याची घटना घडली. या घटनेने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.
अ‍ॅड. लिलाधर डेकाटे यांनी एपी-१५-बीबी-३६६६ क्रमांकाची स्वत:ची कार न्यायालय इमारतीच्या समोर ठेवून ते न्यायालयात गेले. काही वेळानंतर गाडीतून धूर निघण्यास सुरुवात झाली. वाहन जळत असल्याचे लक्षात येताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती नगर पालिकेच्या अग्निशामन यंत्रणेला दिली. त्यानंतर लगेच अग्निशामन यंत्रणेचे वाहन घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणली.
आगीमुळे वाहनाचे इंजीन जळाले. मात्र चालकाचे समोरचे सिट व मागचा भाग आगीतून बचावला. (नगर प्रतिनिधी)

 

Web Title: Advocates burnt the lawyer