73 हजार 443 नागरिकांनी घेतली काेराेनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 05:00 AM2021-04-23T05:00:00+5:302021-04-23T05:00:32+5:30

गडचिराेली जिल्ह्यात प्राथमिक उपकेंद्र, आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हास्तरावरील शासकीय रुग्णालय मिळून एकूण ६८ शासकीय लसीकरण केंद्र आहे, तर गडचिराेली शहरात दाेन खासगी रुग्णालयात लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यात आतापर्यंत काेराेनाचे एकूण १६ हजार ९३६ रुग्ण झाले आहे. यापैकी १२ हजार ७७३ जण काेरेानामुक्त झाले आहे.

73 thousand 443 citizens were vaccinated against caries | 73 हजार 443 नागरिकांनी घेतली काेराेनाची लस

73 हजार 443 नागरिकांनी घेतली काेराेनाची लस

Next
ठळक मुद्देप्रभावी उपाय, लसीकरणानंतर मृत्यूचा धोका कमीच

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला तरी हा प्रादुर्भाव राेखण्यासाठी तेवढ्याच ताकदीने आराेग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. लस घेणे हे काेराेनावर प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने लसीकरणाची माेहीम एकूण ७२ केंद्रांवरून राबविली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७३ हजार ४४३ नागरिकांनी काेराेनाची लस घेतली. एक-दोन अपवाद सोडल्यास लसीकरणानंतर जिल्ह्यात कोणाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 
गडचिराेली जिल्ह्यात प्राथमिक उपकेंद्र, आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हास्तरावरील शासकीय रुग्णालय मिळून एकूण ६८ शासकीय लसीकरण केंद्र आहे, तर गडचिराेली शहरात दाेन खासगी रुग्णालयात लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यात आतापर्यंत काेराेनाचे एकूण १६ हजार ९३६ रुग्ण झाले आहे. यापैकी १२ हजार ७७३ जण काेरेानामुक्त झाले आहे. आतापर्यंत एकूण ५९ हजार ७३७ जणांनी काेराेनाचा पहिला डाेस घेतला तर १३ हजार ७०५ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे. मध्यंतरी काही दिवस लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने ही माेहीम थंडबस्त्यात पडली हाेती. मात्र आता पुरवठा हाेऊ लागल्याने लसीकरण माेहिमेला हळूहळू वेग येत आहे. 

राेगप्रतिकारशक्ती वाढते
काेराेनावर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. लस घेतल्यानंतर बऱ्याच दिवसांनी संबंधित नागरिकाचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला तरी त्याचा मृत्यू हाेण्याची शक्यता फार कमी आहे. लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याने लस घेतलेल्या नागरिकांची राेगप्रतिकारक शक्ती बरीच वाढते. त्यामुळे लागण झाली तरी फारसा परिणाम हाेत नाही.

दाेन्ही डाेस घेतलेले नागरिक बिनधास्त
काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांसाेबतच लस घेणे गरजेचे आहे. पहिला व दुसरा डाेस घेणे आवश्यक आहे. जिल्हाभरात आतापर्यंत एकूण १३ हजार ७०५ नागरिकांनी काेराेनाचे दाेन्ही डाेस घेतले. दाेन्ही डाेस घेतलेले नागरिक आता काेराेना संसर्गाबाबत काही प्रमाणात बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे.

 

Web Title: 73 thousand 443 citizens were vaccinated against caries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.