५१ काराेनामुक्त तर ६९ नवीन बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:26 IST2021-06-03T04:26:12+5:302021-06-03T04:26:12+5:30

आतापर्यंत एकूण काेराेनाबाधितांची संख्या २९ हजार ४५६ झाली आहे. त्यापैकी २८ हजार ५२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ...

51 cars free and 69 new affected | ५१ काराेनामुक्त तर ६९ नवीन बाधित

५१ काराेनामुक्त तर ६९ नवीन बाधित

आतापर्यंत एकूण काेराेनाबाधितांची संख्या २९ हजार ४५६ झाली आहे. त्यापैकी २८ हजार ५२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ६९१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ७२२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. तीन नवीन मृत्यूमध्ये ६५ वर्षीय महिला मुधोली चेक ता.चामोर्शी, ४५ वर्षीय पुरुष हळदा ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, ३१ वर्षीय पुरुष अहेरी यांचा समावेश आहे.

नवीन ६९ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १४, अहेरी तालुक्यातील ५, आरमोरी ३, भामरागड २, चामोर्शी १५, धानोरा ६, एटापल्ली १, मुलचेरा १५, सिरोंचा ५ तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये ३ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ५१ रुग्णांमध्ये गडचिरोली २७, अहेरी ५, आरमोरी ४, चामोर्शी ७, धानोरा २, कोरची ४, कुरखेडा १ तसेच देसाईगंज तालुक्यातील एका जणाचा समावेश आहे.

Web Title: 51 cars free and 69 new affected