शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

१२० वर्षे जुन्या वडसा रेल्वेस्थानकाचे रूप पालटू लागले

By admin | Updated: September 14, 2016 01:47 IST

१८९६ काळात निर्माण झालेल्या १२० वर्ष जुन्या गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकावर

विकासकामांना आली गती : नक्षलग्रस्त भागातील एकमेव रेल्वेस्थानकपुरूषोत्तम भागडकर  देसाईगंज१८९६ काळात निर्माण झालेल्या १२० वर्ष जुन्या गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकावर सध्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असून या रेल्वेस्थानकाचे रूप पालटण्यास सुरूवात झाली आहे. देसाईगंज रेल्वेस्थानकाची निर्मिती कधी झाली, याची नामोल्लेख कुठेही नसला तरी शकुंतला रेल्वेगाडी पुलिया (नॅरोगेज) जुना रेल्वेपूल निर्मिती वर्ष १८९६ असे लिहिलेले आहे. त्यानुसार या रेल्वेस्थानकाच्या निर्मितीला यंदा १२० वर्ष पूर्ण झाले असल्याचे निश्चितपणे म्हणता येईल. अंदाजे ९ ते १० दशक हा रेल्वे मार्ग नॅरोगेजच होता. मागील १२ वर्षांपूर्वी याचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले व येथून गोंदिया, बल्लारशहापर्यंत प्रवाशी रेल्वे वाहतूक सुरू झाली व शकुंतलेचा प्रवास थांबला. मागील दोन वर्षात शकुंतला चालत असलेल्या या रेल्वे मार्गावर अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या. फलाट, सिंगल व्यवस्था तयार करण्यात आली.नक्षलग्रस्त भागातील रेल्वेस्थानक म्हणून वडसा रेल्वेस्थानकाची ओळख आहे. २० कोटी रूपये या रेल्वेस्थानकाच्या कायापालट करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे विकासकामांना वेग आला आहे. येथे पूर्वी दोन रेल्वेट्रॅक होते. आता नवीन दोन अतिरिक्त रेल्वेट्रॅकचे काम सुरू आहे. उत्तर-दक्षिण सिग्नलच्या दरम्यान रेल्वे मार्गाचे काम निर्माधिन आहे. इंग्रजकालीन वास्तूतून या रेल्वेस्थानकाचे काम चालविले जात होते. या सर्व इमारती निर्लेखीत करण्याचे काम सुरू असून नवीन इमारतीचे बांधकामही येथे वेगाने सुरू आहे. रेल्वेस्थानकात नवीन इमारती, कार्यालय, सिग्नल व्यवस्था, गुडस् ट्रॅक, कृषी व्यावसायिक माल ठेवण्यासाठी नवीन फलाट, गोडाऊन व रेल्वे स्थानक परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नाली बांधकाम, पुलाचे बांधकाम, नवीन क्रॉसींग यंत्रणा उभारली जात आहे. संपूर्ण रेल्वेस्थानक यंत्रणेचे डिजीटलायझेशन करण्यात आले असून लवकरच येथून गडचिरोलीसाठी नवा रेल्वेमार्गही तयार केला जाणार आहे. यासाठी भूमीअधिग्रहण करण्यात येत आहे. यालाही गती देण्यात आली आहे.