रोनाल्डोने यंदाच्या सत्रात नोंदविली तिसरी हॅटट्रिक, ७२ तासांत दुसऱ्यांदा केला पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 05:46 IST2024-04-04T05:45:32+5:302024-04-04T05:46:04+5:30

Cristiano Ronaldo : पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो याने यंदाच्या सत्रात लीगमध्ये तिसरी हॅटट्रिक साधली. गेल्या ७२ तासांत त्याची ही दुसरी हॅटट्रिक ठरली.

Cristiano Ronaldo scored his third hat-trick of the season, second in 72 hours | रोनाल्डोने यंदाच्या सत्रात नोंदविली तिसरी हॅटट्रिक, ७२ तासांत दुसऱ्यांदा केला पराक्रम

रोनाल्डोने यंदाच्या सत्रात नोंदविली तिसरी हॅटट्रिक, ७२ तासांत दुसऱ्यांदा केला पराक्रम

आभा (सौदी अरेबिया) - पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो याने यंदाच्या सत्रात लीगमध्ये तिसरी हॅटट्रिक साधली. गेल्या ७२ तासांत त्याची ही दुसरी हॅटट्रिक ठरली. त्याच्या कामगिरीच्या बळावर नऊ वेळेचा चॅम्पियन अल नासरने सौदी प्रो लीग फुटबॉलमध्ये आभा क्लबचा ८-० ने पराभव केला. 

 रोनाल्डोने पूर्वार्धातील खेळात तीन गोल केले व त्यानंतर दोन गोल नोंदविण्यात मदत केली. शनिवारी अल नासरच्या अल ताई संघावरील ५-१ अशा विजयातही रोनाल्डोने  हॅटट्रिक साधली होती. रोनाल्डोचे या लीगमध्ये २९ गोल झाले असून तो अव्वल स्थानावर आहे. या विजयानंतरही अल नासर मात्र दुसऱ्या स्थानावर आहे. अव्वल स्थानावर असलेल्या अल हिलाल संघापेक्षा त्यांचे १२ गुण कमी असून  लीगमध्ये अद्याप आठ फेऱ्या शिल्लक आहेत.

हॅटट्रिकची ‘हॅटट्रिक’
रोनाल्डोची सौदी अरबमधील जादुई कामगिरी कायम आहे. त्याने यंदाच्या सत्रात तिसरी हॅटट्रिक नोंदवली. रोनाल्डोचा धडाका आगामी सामन्यांतही कायम राहिल्यास अल नासरला रोखणे प्रतिस्पर्ध्यांना कठीण होईल.

Web Title: Cristiano Ronaldo scored his third hat-trick of the season, second in 72 hours