Argentina blocked Uruguay at par | अर्जेंटिनाने उरुग्वेला बरोबरीत रोखले
अर्जेंटिनाने उरुग्वेला बरोबरीत रोखले

तेल अवीव : इंज्युरी टाईममध्ये लियोनल मेस्सीने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने मैत्रीपूर्ण सामन्यात ऊरुग्वेशी २-२ अशी बरोबरी साधत पराभव टाळला. बार्सिलोनामधील मेस्सीचा सहकारी लुईस सुआरेज याने अर्जेंटिनासमोर चागंलेच आव्हान निर्माण केले. सुआरेज मेस्सीवर वरचढ चढणार असे वाटत असतानाच मिळालेल्या पेनल्टीवर गोल करत मेस्सीने डाव पालटला.

इन्ज्युरी टाईममध्ये (९०+२) उरुग्वेच्या खेळाडूचा हात चेंडूला लागला. यावर पंचांनी अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. मेस्सीने यावर गोल करत सामना २-२ असा बरोबरीत सोडवला. तत्पुर्वी सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला ऊरुग्वेच्या एडिसनने पहिला गोल नोंदवला. त्यानंतर अर्जेटिनाच्या सार्गियो अगुएरो याने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.

अर्जेंटिनाला हा आनंद जास्त वेळ लाभला नाही. त्यानंतर पाचच मिनिटात लुईस सुआरेजने शानदार कामगिरी करताना बॉक्सच्या बाहेरुन मारलेल्या फ्री किकवर अप्रतिम गोल नोंदवला. यावेळी अर्जेटिनावर पराभवाची टांगती तलवार होती. अखेरच्या क्षणापर्यंत उरुग्वेने वर्चस्व राखले होते. मात्र इन्ज्युरी टाईमध्ये झालेली चूक उरुग्वेला महागात पडली आणि मिळालेली संधी साधत मेस्सीने अर्जेंटिनाचा पराभव टाळला.

Web Title: Argentina blocked Uruguay at par

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.