काही चटपटीत खाल्ल्यावर कानातून 'धूर' अन् नाकातून पाणी का येऊ लागतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 09:46 AM2019-12-27T09:46:38+5:302019-12-27T09:55:50+5:30

चटपटीत खाणाऱ्या किंवा स्ट्रीट फूड खाणाऱ्या लोकांना नेहमीच असा अनुभव येत असेल.

Why we get runny nose and burning ear after eating spicy food | काही चटपटीत खाल्ल्यावर कानातून 'धूर' अन् नाकातून पाणी का येऊ लागतं?

काही चटपटीत खाल्ल्यावर कानातून 'धूर' अन् नाकातून पाणी का येऊ लागतं?

googlenewsNext

(Image Credit : sweatblock.com)

चटपटीत खाणाऱ्या किंवा स्ट्रीट फूड खाणाऱ्या लोकांना नेहमीच असा अनुभव येत असेल. या सर्व लोकांना माहीत असतं की, त्यांनी तिखट काही खाल्लं तर त्यांच्या कानातून कसा धूर निघतो आणि नाक वाहू लागते. कधीकधी तर डोळ्यातून पाणी सुद्धा येतं. पण याचं नेमकं कारण काय असतं? चला जाणून घेऊ तेच कारण...

केवळ तिखट नाही तर मसालेही जबाबदार

चटपटीत पदार्थांमध्ये तिखटासोबतच इतरही काही मसाले असतात. अशात ज्या लोकांना हे माहीत नसतं की, जेवण फार तिखट आहे. अशात त्यांना पदार्थ खाल्ल्यावर त्यांच्या नाकातून पाणी येऊ लागतं आणि कानाला गरमपणा जाणवतो. 

असं का होतं?

कॅप्सिअसन एक केमिकल तत्त्व असतं. हे जास्तीत जास्त त्या झाडांमध्ये आढळतं, जे जीनस कॅप्सिकम फॅमिलीतील असतात. हे तत्व प्रत्येक तिखट मसाल्यात आढळून येतं. हेच कॅप्सिअसन जीभ, कान आणि नाकाची जळजळ होण्याचं कारण असतं. यानेच जेवताना डोळ्यातून पाणी येऊ लागतं.

शरीर कसं करतं रिअ‍ॅक्ट

(Image Credit : uk.rs-online.com)

कॅप्सिअसनमुळे होणाऱ्या जळजळीमुळे अनेकांना त्रास होतो आणि शरीर या इरिटेशनपासून मुक्ता मिळवण्यासाठी फाइट करते. कॅप्सिअसनमुळे शरीरात म्यूकस वाढू लागतं आणि शरीर हे म्यूकस नाकाद्वारे बाहेर काढू लागते. ज्यामुळे नाक वाहू लागतं.

इंटरनल मेकॅनिजम

जळजळ हो असल्याने शरीराचं इंटरनल मेकॅनिजम अ‍ॅक्टिव होतं आणि शरीर वेगवेगळ्या अवयवांमध्ये होत असलेली जळजळ शांत करण्यासाठ काम करू लागतं. हेच कारण आहे की, जास्त तिखट खाल्ल्यावर आपल्या तोंडात भरपूर प्रमाणात लाळ तयार होते.

नुकसानकारक नाही

मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यावर कॅप्सिअसनमुळे आपल्याला जळजळ नक्कीच होते, पण हा मसाला आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक नाही. याने आपलं मेटाबॉलिज्म मजबूत होण्यास मदत मिळते. याने डोळे आणि नाकाची अंतर्गत स्वच्छता होते. अशाप्रकारचे पदार्थ तुम्ही कधी कधी शरीरातील म्यूकल ब्लॉकेज दूर करण्यासाठी खाल्ले पाहिजेत.


Web Title: Why we get runny nose and burning ear after eating spicy food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.