शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

चिक्कू खाण्याचे 'हे' फायदे वाचाल, तर एकदा नाही पुन्हा पुन्हा चिक्कू खाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 11:08 AM

हिवाळ्यात आवडीने खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिक्कू. लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खाणं आवडतं. इतकंच काय तर अनेकजण चिक्कूचा ज्यूसही घेतात.

हिवाळ्यात आवडीने खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिक्कू. लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खाणं आवडतं. इतकंच काय तर अनेकजण चिक्कूचा ज्यूसही घेतात. चवीला गोड असण्यासोबतच चिक्कूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण हे फळ खाण्याऱ्या लोकांनाच याचे फायदे माहीत नसतात. खासकरुन हिवाळ्यात चिक्कूचा आहारात समावेश करणे अधिक फायद्याचे ठरते. कारण चिक्कू खाल्ल्याने अग्नाशय मजबूत होतं, तसेच याने इम्यूनिटी सिस्टीमही चांगलं होतं. त्यासोबतच चिक्कूमध्ये व्हिटॅमिन सी आढळतं जे बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करतं. चला जाणून घेऊ याचे आणखी काही फायदे....

पचनक्रिया चांगली होते

हे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे की, फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या फळांनी पचनक्रिया चांगली होते. याने आतड्याही चांगल्या राहतात. चिक्कूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं, ज्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारची औषधे तयार करण्यासाठीही केला जातो. तसेच चिक्कू खाल्ल्याने पोटाची समस्याही दूर होते. 

पोटाशी संबंधित समस्या दूर होते

चिक्कूमध्ये टॅनिनचं प्रमाण अधिक असतं, हे अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी एजंटसारखं काम करतं. ज्यामुळे पोटाशी संबंधित आणि आतड्यांशी निगडीत समस्या जसे की, esophagitis, enteritis, irritable bowel syndrome, and gastritis यांपासून बचाव केला जाऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे कधीही पोटाची समस्या झाली तर चिक्कू खायला विसरु नका.

सर्दी-पळसाही होतो दूर

थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त लोकांना सर्दी-पळस्याची समस्या असते. अशावेळी चिक्कू खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. चिक्कू खाल्ल्याने छातीत अडकलेला कफ नाकावाटे बाहेर पडतो. याने तुम्हाला लगेच आराम मिळू शकतो. अनेकांचा असा समज असतो की, हे फळ थंड असल्याने याने सर्दी होते, पण हा समज चुकीचा आहे. या फळामुळे सर्दी बरी होते. 

हाडे होतात मजबूत

हाडांच्या मजबूतीसाठी सर्वात जास्त गरजेचे असतात ते कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि आयर्नसारखे मिनरल्स. चिक्कूमध्ये हे सर्व मिनरल्स आढळतात. त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही आजच चिक्कूचं सेवन करायला सुरुवात करा. लहान मुलांना हे फळ जास्तीत जास्त खायला द्यायला हवं, जेणेकरुन त्यांच्या हाडांचा विकास चांगला होईल. 

अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट

चिक्कूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोषक तत्वे असतात. व्हिटॅंमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी यात अधिक प्रमाणात असतात. जर तुम्ही नियमीत चिक्कू खाल्ले तर तुमची त्वचा हेल्दी आणि मॉइश्चराइज होईल. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असल्या कारणाने या फळामुळे त्वचेवर होणाऱ्या सुरकुत्यांपासूनही बचाव होणार आहे. त्यासोबतच हे फळ खाल्ल्याने केसही मुलायम होतात आणि केसगळतीही थांबते. त्यामुळे हे फळ जास्तीत जास्त खावे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारBeauty Tipsब्यूटी टिप्स