Join us

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 9:53 AM

Stock Market Open: शेअर बाजाराच्या कामकाजाला गुरुवारी तेजीसह सुरुवात झाली आहे. बीएसई सेन्सेक्स ३०५ अंकांच्या वाढीसह ७३२९२ अंकांवर उघडला.

Stock Market Open: शेअर बाजाराच्या कामकाजाला गुरुवारी तेजीसह सुरुवात झाली आहे. बीएसई सेन्सेक्स ३०५ अंकांच्या वाढीसह ७३२९२ अंकांवर तर निफ्टी ९० अंकांच्या वाढीसह २२२९० अंकांवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिडकॅप १००, निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी स्मॉल कॅप या निर्देशांकांमध्ये तेजी दिसून आली. मात्र त्यानंतर त्यात थोडी घसरण झाली. 

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात तेजी दाखवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर एलटीआय माइंडट्री, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस आणि हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता. तर पॉवर ग्रिड, मारुती, कोल इंडिया, टाटा मोटर्स, एनटीपीसी, सिप्ला आणि डिव्हिस लॅबच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. शेअर बाजारातील मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांबाबत बोलायचं झालं तर त्यापैकी ओएनजीसी, इंजिनिअर्स इंडिया, आयसीआयसीआय बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचडीएफसी बँक, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती, तर लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स घसरणीवर कार्यरत होते. 

प्री ओपन मार्केटची स्थिती 

प्री-ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स ३५१ अंकांच्या वाढीसह ७३३३८ अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी ११९ अंकांच्या वाढीसह २२३१९ अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराचे कामकाज तेजीने सुरू होऊ शकते, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते. गुरुवारी सकाळी आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली. 

टॅग्स :शेअर बाजार