शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

​​जगातील सर्वांत वेगवान बुलेट ट्रेन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:49 IST

 जगभरात मात्र अशा बुलेट ट्रेन्स चक्क वाºयाशी स्पर्धा करीत आहेत

बुलेट ट्रेनचे औत्सुक्य भारतीयांना खूपच आहे. त्याच त्या रखडत जाणाºया ट्रेन पाहून भारतीय कंटाळले आहेत. त्यांना भारतामध्ये बुलेट ट्रेन केव्हा येतेय असं झालंय. भारतात बुलेट ट्रेन धावणार आहे, पण कधी ते सांगता येणार नाही. जगभरात मात्र अशा बुलेट ट्रेन्स चक्क वाºयाशी स्पर्धा करीत आहेत.  अशाच काही वेगवान बुलेट ट्रेन्सची ही माहिती...शांघाय माग्लेवजगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन चीनमध्ये धावत आहे. खºया अर्थाने बुलेटचा अर्थ या ठिकाणी समजतो. या ट्रेनचा सर्वाधिक वेग ४३० किमी प्रतितास इतका आहे. साधारण वेग २५० कि. मी. प्रतितास इतका आहे. २००४ साली ही ट्रेन लोकांसाठी खुली करण्यात आली. शांघाय माग्लेव डेव्हलपमेंट कोआॅपरेशनच्या सहकार्याने ही ट्रेन चालविली जाते. टैसेन आणि सिमेन्स कंपनीने ती तयार केली आहे. एकावेळी ५७४ प्रवासी यात प्रवास करू शकतात. भारतीय रुपयानुसार तिचे तिकीट ५५० रुपयांपासून ते ११०० रुपयांपर्यंत आहे.हार्मनी ३८० एजगातील ही दुसºया क्रमांकाची वेगवान ट्रेन असून, ती चीनमध्ये धावते. याच्या चाचणीदरम्यान एक विक्रम झाला. ४१६.६ कि. मी. प्रतितास इतक्या वेगाने ही ट्रेन धावली. २०१० साली ही ट्रेन प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. शांघाय आणि बिजिंग दरम्यान ती धावते. सीएसआर लोकोमोटिव्ह आणि रोलिंग स्टॉक कंपनीजने या ट्रेनची निर्मिती करण्यात आली. ४९४ प्रवासी यात बसू शकतात. यामध्ये बºयाच सोयीसुविधा आहेत.एजीव्ही इटालो२००७ साली घेतलेल्या चाचणीत या ट्रेनने सर्व विक्रम मोडले. ५७४ कि. मी. प्रतितास इतक्या वेगाने ती धावली. सध्या ३६० कि. मी. प्रतितास असा तिचा वेग आहे. फ्रेंच कंपनी अल्स्टॉमने या ट्रेनची निर्मिती केली आहे. नापोली-रोमा-फ्रिएेंज-बोलोग्रा-मिलानो दरम्यान धावते. नापोली ते रोम हे अंतर १८९.७ कि. मी. इतके असून एका तासापेक्षा कमी वेळेत ती तेथे पोहोचते. या गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ९८ टक्के टाकाऊ वस्तूपासून ही ट्रेन तयार करण्यात आली आहे.