‘#100साडीपॅक्ट’चा अनोखा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 19:08 IST2016-04-20T13:38:13+5:302016-04-20T19:08:13+5:30

याविषयी जनजागृती वाढावी या उद्देशाने ‘100 सारी पॅक्ट’ नावाचा अभिनव उपक्रम सुरू झाला आहे.

Unique experiment of '# 100 Seduct' | ‘#100साडीपॅक्ट’चा अनोखा प्रयोग

‘#100साडीपॅक्ट’चा अनोखा प्रयोग

णत्याही देशाची संस्कृती तेथील लोकांच्या पेहराव आणि वेशभुषेतून दिसत असते. परंतु पाश्चिमात्य देशांच्या फॅशनचा प्रभाव पाहता नवी पिढी पारंपरिक वस्त्रांपासून दूर जात आहे.

याचा सर्वात मोठा प्रभाव ‘साडी’ या आपल्या देशातील महिलांच्या पेहरावावर पडत आहे. परंतु याविषयी जनजागृती वाढावी या उद्देशाने ‘100 सारी पॅक्ट’ नावाचा अभिनव उपक्रम सुरू झाला आहे.

बेंगलोरमध्ये राहणाऱ्या दोन मैत्रिणींनी सहज म्हणून प्रत्येकीने शंभर साड्या घालायच्या आणि तो अनुभव आॅनलाईन शेअर करण्याचा निर्णय घेतला. गंमतीने घेतलेला हा निर्णय पुढे चालून एका मोहिमेत रुपांतरित होईल याची त्यांना कल्पना नव्हती. साडीला बाजारपेठ व मान आणि विणकाम करणाऱ्या कलाकारांना त्यांचे स्थान मिळवून देण्याचा वसाच आता त्यांनी घेतला आहे.

‘द रेजिस्ट्री आॅफ सारीज्’ (टीआरएस) या संस्थेच्या माध्यमातून अ‍ॅली मॅथन व त्यांची सहकारी अपूर्वा सदानंद आणि टेक्स्टाईल एक्सपर्ट कौशल्या सत्याकुमार साडी संवर्धन आणि प्रचाराचे काम करत आहेत.

मॅथन सांगतात, साडी परिधान केल्यानंतर येणारे अनुभव जास्तीत महिलांपर्यंत पोहचावे, त्यांना साडी घालण्यासाठी प्रेरित करावे हा आमचा उद्देश आहे. कपडा उद्योग व ग्राहक यांच्यामध्ये संवाद घडावून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

यासाठी ‘टीआरएस’ तीन कलमी कार्यक्रम राबविणार आहे.

1. सेमिनार व अनुभव शेअरिंगच्या माध्यमातून साडीचे महत्त्व पटवून देणे. साडीप्रेमीं या व्यापार, कला, संस्कृतिविषयी भरभरून बोलतील.

2. विणकाम करणाºया कलाकारांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देणे. या कलाकारांचे पुनरोत्थान करण्याचे मोठे काम याद्वारे करण्यात येणार आहे.

3. ‘टीआरएस’ची अधिकृत ई-कॉमर्स वेबसाईट 30 एप्रिलपर्यंत तयार करण्यात येणार आहे. ज्याद्वारे साडी खरेदी करता येणार आहे.

Web Title: Unique experiment of '# 100 Seduct'