पहिल्या डेटवर भारतीय करतात खेळाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 21:09 IST2016-05-07T15:39:34+5:302016-05-07T21:09:34+5:30

आपल्या देशाचा विचार केला तर, पहिल्या डेटवर मुलं कुटुंबानंतर ‘स्पोर्ट्स’विषयी अधिक बोलतात.

Talk about the game that Indians do on the first date | पहिल्या डेटवर भारतीय करतात खेळाची चर्चा

पहिल्या डेटवर भारतीय करतात खेळाची चर्चा

िल्या डेटवरूनच रिलेशनशिप यशस्वी होईल का नाही हे ठरत असते. त्यामुळे तरुण पहिल्या डेटच्या बाबतील फार गंभीर असतात.

आपल्या आवडत्या मुलीविषयी अधिक जाणून घेण्याची ही खरी संधी असते. एकमेकांना ‘इम्प्रेस’ करण्याचा दोघेही प्रयत्न करत असतात. आपल्या देशाचा विचार केला तर, पहिल्या डेटवर मुलं कुटुंबानंतर ‘स्पोर्ट्स’विषयी अधिक बोलतात.

‘बनीहाल’ने केलेल्या एका रंजक सर्वेक्षणातून हे तथ्य समोर आले आहे.  पहिल्या डेटवर मुलं खेळांविषयी संभाषण करणे पसंत करतात. एक तर दोघेही पहिल्या डेटवर ‘नर्व्हस’ असतात. त्यामुळे काय बोलावे हा प्रश्नच असतो.

एखाद्या गोष्टीविषयी मुर्खाप्रमाणे बोलण्याचा धोका उचलण्यास दोघेही तयार नसतात. म्हणून खेळासारख्या कॉमन विषयावर बोलण्यास प्राधान्य देण्यात येते.

सुमोर 21 टक्के पुरुष पहिल्या डेटवर खेळांविषयी बोलतात. विशेष म्हणजे, 14 टक्के मुलींना खेळांविषयी बोलायला आवडते. आपल्या होणाºया जोडीदाराला पहिल्यांदा भेटल्यावर आजही भारतात सर्वाधिक चर्चा कुटुंबावरच होते.

त्यानंतर ‘स्पोर्ट्स’चा क्रमांक लागतो. महिलांमध्ये कुटुंबाविषयी बोलण्याप्रवृत्ती अधिक आढळते. सुमारे 70 टक्के मुलींचा यामध्ये सामावेश होतो तर केवळ 44 टक्के मुलांना कुटुंबाविषयी बोलायला आवडते.

Web Title: Talk about the game that Indians do on the first date