शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 20:45 IST

काही आवश्यक गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिले तर ट्रिपचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो.

गोव्यासारख्या ठिकाणी ट्रिपसाठी गेल्यावर समुद्रकिनारी फिरण्याचा मोह कोणाला आवरता येईल? मस्तपैकी मऊ मऊ वाळूत फिरताना आणि लाटांबरोबर पोहण्याची मजाच वेगळी असते.

समुद्राच्या पाण्यात धमालमस्ती करण्या आगोदर मात्र थोडी काळजी घेण्याची गरज असते. काही आवश्यक गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिले तर ट्रिपचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो. 

डिहायड्रेशन (निर्जलीकरण) : 

समुद्रकिनारी डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे किनारी फिरताना आपल्याजवळ विविध ड्रिंक्स ठेवायला पाहिजे. समुद्रात खेळताना ते पाणी नााक- तोंडात जाते. खारट पाण्यामुळे शरीरात मीठाचे प्रमाण वाढून डिहायड्रेशन होऊ शकते. 

सिरका सोबत ठेवा : 

समुद्रकिनारी गेल्यानंतर सोबत बॅगमध्ये सिरकाची बॉटल आवश्य ठेवावी. पाण्यामध्ये एखाद्या माशाने दंश केला तर सिरका लावावा. 

मुलांवर लक्ष ठेवा : 

समुद्र किनारी फिरत असताना मुलांवर लक्ष ठेवणे खूप आवश्यक असते. मुले बीचवर रस्ता विसरण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर सोबत भडक आणि ब्राईट  रंगाची छत्री राहू द्या. छत्री आणि टॉवेल अशा ठिकाणी ठेवा की, मुलांना ते दिसेल व ते रस्ता विसरणार नाही. 

पाण्यात जास्त आत जाऊ नका : 

समुद्रात खेळत असताना लोक अनेकदा किनाºयापासून खूप दूर पोहत जातात. तुम्ही कितीही एक्सपर्ट पोहणारे असला तरी असे करणे खूप धोकादायक आहे. लाटांचा वेग आणि आकाराचा अंदाज लावणे खूप कठिण असते. त्यामुळे शक्यतो किनाºयावर उभे राहूनच सुमद्राचा आनंद घ्यावा.