प्रिंसच्या चाहत्यांचा राग अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 18:27 IST2016-04-24T12:57:27+5:302016-04-24T18:27:27+5:30

जस्टीनची ही प्रतिक्रिया हास्यस्पद 

Prince's fans are angry | प्रिंसच्या चाहत्यांचा राग अनावर

प्रिंसच्या चाहत्यांचा राग अनावर

ong>पॉप संगीतातील आदर्श असणाºया प्रिन्सचे निधन झाल्यानंतर गायक जस्टीन बायबरने केलेल्या वक्तव्याचा प्रिन्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. लाईव्ह परफॉर्मन्सचा बादशाहला हरवून बसलो अशी प्रतिक्रिया रॉक म्यूझिसियन अ‍ॅन्ड्यू वॅटने दिल्यानंतर त्याची जस्टीनने खिल्ली उडवली आहे.

त्यामुळे प्रिन्सचे चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. अ‍ॅन्ड्यू वॅटने दिलेल्या प्रतिक्रियेला जस्टीन बायबरने इन्स्टाग्रामवर आपली असहमती दर्शवली आहे. लाईव्ह परफॉर्मन्समध्ये प्रिन्स श्रेष्ठ नव्हता तर आपणच श्रेष्ठ असल्याचा आविर्भाव जस्टीने दाखवला.

जस्टीनची ही प्रतिक्रिया हास्यस्पद असल्याचे प्रिन्सच्या चाहत्यांनी म्हटले आहे. प्रिन्सच्या जवळपासही पोहचण्याची क्षमता जस्टीनमध्ये नाही असे काहींची मते आहेत.

Web Title: Prince's fans are angry