​प्रिन्सच्या अस्थी राहणार ‘सिक्रेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 19:14 IST2016-04-24T13:44:13+5:302016-04-24T19:14:13+5:30

प्रिन्सच्या ‘अस्थीं’ना एका खाजगी आणि सुरक्षित जागी ठेवण्यात येणार आहे. 

Prince's bone will remain 'secret' | ​प्रिन्सच्या अस्थी राहणार ‘सिक्रेट’

​प्रिन्सच्या अस्थी राहणार ‘सिक्रेट’

गीतविश्वाला हादरून सोडणाऱ्या प्रिन्सचे अचानक निधन झाल्याने त्याचे चाहते दु:खात आहेत. संपूर्ण जगभरातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहेत. शनिवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे कुटुंबिय, नातेवाईक, साथीदार आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

त्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्सच्या ‘अस्थीं’ना एका खाजगी आणि सुरक्षित जागी ठेवण्यात येणार आहे. अस्थी कुठे ठेवण्यात येतील याविषयी माहिती आताच उघड करण्यात येणार नाही.

अतिशय साध्यापद्धतीने मित्रपरिवाराच्या उपस्थित प्रिन्सवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लवकरच त्याला संगीतमय श्रद्धांजली देण्यासाठी एका कॉर्न्स्टचे आयोजन करण्यात येईल.

या संगीत कॉन्सर्टची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याचे अ‍ॅना मिचमने सांगितले. प्रिन्स त्याच्या लाजवाब संगीतबरोबरच अखंड क्षमेतेसाठी ओळखला जायचा.

काम करताना त्याला कशाचेच भान राहत नसे. लगातार चार-पाच दिवस तो न झोपता आपल्या रेकॉर्डिंगवर काम करत असे. गुरुवारी त्याच्या पैस्ले पार्क येथील घरी तो मृत आढळून आला.

Web Title: Prince's bone will remain 'secret'