अन्नाची नासडी टाळण्यासाठी आधी फ्रिज ‘चेक’ करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 19:34 IST2016-04-24T14:04:01+5:302016-04-24T19:34:01+5:30

सामानाची खरेदी करण्यापूर्वी जाणीवपूर्वक फ्रिजमध्ये काय आहे हे तपासा. 

To prevent food poisoning, first check 'Fridge' | अन्नाची नासडी टाळण्यासाठी आधी फ्रिज ‘चेक’ करा

अन्नाची नासडी टाळण्यासाठी आधी फ्रिज ‘चेक’ करा

्नाची मोठ्या प्रमाणावर होणारी नासडी फार गंभीर मुद्दा आहे. यावर एका सोपा तोडगा डेन्मार्क येथील तज्ज्ञांनी सुचवला आहे. सामानाची खरेदी करण्यापूर्वी जाणीवपूर्वक फ्रिजमध्ये काय आहे हे तपासा. त्यामुळे अनावश्यक भाज्या आणि सामान आणणे टाळून अन्नाची नासडी होणार नाही.

जगातील एकुण अन्नाच्या एकतृतांश अन्न हे वाया जाते. एवढ्या प्रचंड प्रमाणात होणारी नासडी ग्लोबल वॉर्मिंग सारख्या पर्यावरणीय समस्येत भर घालते, अशी माहिती जेसिका अश्चेमन-विट्झेल यांनी दिली. त्या सांगतात, अन्नाची नासडी फार क्षुल्लक काराणांमुळे होते. थोडे नीट लक्ष देऊन काळजी घेतली तर ही नासडी टाळता येऊ शकते.

अन्नाची नासडी य समस्येचे विविध भागांत वेगवेगळे परिणाम दिसून येतात. गरीबा आणि अविकसित देशांमध्ये अन्ननिर्मितीच्या  प्रक्रियेतच ते वाया जाते. तिथे उपलब्ध असलेले निकृष्ट दर्जाचे साहित्य याला कारणीभूत आहे. त्यामुळे उत्कृष्ट दर्जाचे अन्ननिर्मिती व साठवणीचे साहित्य पुरवणे गरजेचे आहे.

Web Title: To prevent food poisoning, first check 'Fridge'