शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

​पेगी व्हिटसन होणार सर्वात वयोवृद्ध महिला अंतराळवीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 14:26 IST

५६ वर्षीय पेगी यांनी नुकतेच अंतराळात उड्डाण केले असून आगामी फेब्रुवारी महिन्यात इंटरनॅशन स्पेस स्टेशनवर ५७वा वाढदिवस साजरा करणार आहे.

नासाच्या अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नावावर लवकरच सर्वात वयोवृद्ध महिला अंतराळवीर होण्याचा विक्रम नोंदवण्यात येणार आहे. ५६ वर्षीय पेगी यांनी नुकतेच अंतराळात उड्डाण केले असून आगामी फेब्रुवारी महिन्यात इंटरनॅशन स्पेस स्टेशनवर ५७वा वाढदिवस साजरा करणार आहे.आयोवास्थित बायोकेमिस्ट पेगी तिसऱ्यांदा स्पेस मिशनवर गेलेल्या असून कमांडर म्हणून त्यांची ही दुसरी मोहिम आहे. कझाकिस्तान येथून त्यांनी रशिया आणि फ्रान्सच्या दोन तरुण अंतराळवीरांसह उड्डाण केले.नासा’मध्ये काम करणे माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. परंतु जे समाधान स्पेस स्टेशनवर काम करताना मिळते ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. मग ते काम छोटे का असेना, परंतु आपण मानवीकल्याणासाठी मोठे योगदान देतो आहोत ही भावना खूप सुखावणारी असे. या शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली.स्पेस मिशनची पहिली कमांडर म्हणूनही तिच्या नावे विक्रम आहे. नासाच्या पुरुष बहुल मिशनची पहिली आणि एकमेव महिला कमांडर होण्याची किमयादेखील तिने साधली आहे.रेडी टू स्पेस :पेगी व्हिटसनयापूर्वी सर्वात वयोवृद्ध महिला अंतराळवीर होण्याचा विक्रम बार्बरा मॉर्गन यांच्या नावे होता. त्यांनी २००७ साली वयाच्या ५६ व्या वर्षी उड्डाण केले होते.  तसे पाहिले तर बहुमान जॉन ग्लेन यांच्या नावे असून त्यांनी  वयाच्या ७७ व्यावर्षी स्पेसवारी केली होती. पेगीचा पतीसुद्धा बायोकेमिस्ट असून तोदेखील नासामध्येच कार्यरत आहे. आतापर्यंत ती ३७७ दिवस अंतराळ राहिलेली असून या सहा महिन्यांच्या तिसऱ्या मिशनसह ५३४ दिवसांचा विक्रम ती मोडणार आहे. या मिशनमध्ये तिच्यासोबत ओलेग नोव्हित्स्की (४५) आणि प्रथम स्पेसवारी करणारा थॉमस पेस्क्विेट (३८) हे दोघे आहेत.