शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आता स्मार्टफोनद्वारे करा स्कॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 16:07 IST

बऱ्याचदा आपल्या जवळच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रत काढण्यासाठी झेरॉक्स काढणे, डिजिटल स्वरूपात असलेल्या कागदपत्रांची प्रत मिळवण्यासाठी त्याची प्रिंट काढणे आणि कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी आपण ती स्कॅन करून ठेवतो....

बऱ्याचदा आपल्या जवळच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रत काढण्यासाठी झेरॉक्स काढणे, डिजिटल स्वरूपात असलेल्या कागदपत्रांची प्रत मिळवण्यासाठी त्याची प्रिंट काढणे आणि कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी आपण ती स्कॅन करून ठेवतो. कारण आपल्यापैकी प्रत्येकाला या गोष्टी करण्याची गरज कधी ना कधी खरं तर सततच पडत असते. आता यापैकी महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करण्याचे काम तुम्ही घरच्या घरी संपूर्ण विनामूल्य ‘मायक्रोसॉफ्टच्या आॅफिस लेन्स’ या अ‍ॅपच्या सहाय्याने स्मार्टफोनद्वारे करू शकता, म्हणजेच त्यासाठी तुम्हाला घरी स्कॅनर असण्याची आवश्यकता नाही. मायक्रोसॉफ्ट आॅफिस लेन्स अ‍ॅपद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट जसे की, हस्तलिखित किंवा प्रिंटेड डॉक्युमेंट, बिझनेस कार्ड इत्यादीची डिजिटल कॉपी बनवू शकता. तसेच तुमच्या हस्ताक्षरात ब्लॅक बोर्ड किंवा व्हाइट बोर्डवर नमूद केलेले मुद्दे तसेच काही इमेजेसदेखील स्कॅन करु शकतात. स्कॅन करण्यासाठी आपल्याला केवळ एक फोटो काढावा लागतो. तुम्ही डॉक्युमेंटचा फोटो घेतल्यावर हे अ‍ॅप त्या डॉक्यूमेंटच्या मुख्य कडा आणि शिरोबिंदू ओळखते. इतर अनावश्यक भाग काढून टाकून केवळ मुख्य डॉक्यूमेंटचा फोटो ठळकपणे दर्शवते. तुम्हाला डिजिटल रूपात काय रूपांतरित करायचे आहे, त्यानुसार कुठला मोड निवडायचा हे तुम्ही ठरवू शकता. व्हाइटबोर्ड मोडमध्ये तुम्ही व्हाइटबोर्डचा फोटो काढल्यावर अनावश्यक भाग ट्रीम करू शकता. या मोडमधे बोर्डवरील चकाकी आणि सावली स्कॅन केल्यावर काढून टाकता येते. डॉक्यूमेंट मोडमधे अनावश्यक भाग ट्रीम करण्याबरोबरच अक्षरे आणि रंगीत चित्र अतिशय सुस्पष्टपणे स्कॅन केली जातात. जर तुम्ही प्रिंटेड टेक्स्ट असलेले डॉक्यूमेंट स्कॅन केलेले असेल तर फोटोतील अक्षरे ओसीआर म्हणजेच आॅप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे ओळखली जातात. त्यामुळे तुम्ही या फोटोतील शब्द शोधू शकता. ते कॉपी करू शकता. तसेच त्या डॉक्यूमेंटमध्ये बदल देखील करता येतात.