शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

​आता फेसबुक सांगणार आसपासचे ‘वाय-फाय’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 15:49 IST

फेसबुक स्वत:हून तुम्हाला जवळपासचे वाय-फाय कुठे आहे याची माहिती देणार.

फेसबुकने आपल्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिरकाव केलेला आहे. आपल्या ओळखीच्या लोकांशी कनेक्टेड राहण्याच्या उद्देशाने सुरू झालेले ‘फेसबुक’ आता पूर्णपणे बदललेले आहे. बातम्यांपासून ते जाहिरातीपर्यंत सर्वच गोष्टी फेसबुकच्या माध्यमातून करता येतात.अशा मल्टीपर्पज सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर आणखी एका फीचरची भर पडली आहे.तुमचे मोबाईल इंटरनेट जर स्लो असेल तर फेसबुक स्वत:हून तुम्हाला जवळपासचे वाय-फाय कुठे आहे याची माहिती देणार. ‘रिअल-टाईम इन्फॉर्मेशन शेअरिंग’च्या सुविधेसाठी कंपनीने हे नवे फीचर विकसित केले आहे.यापूर्वी ‘पेजेस्’द्वारे विविध वाय-फाय स्पॉटचे मूळ लोकेशनची माहिती कंपनी गोळा करत असे. याच माहितीच्या आधारे फेसबुकने ‘वाय-फाय’ शोधण्याचे फीचर तयार केले आहे.इंटरनेट कनेक्शन जर बेताचे असेल तर फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करणे असुविधेचे ठरते. अशा वेळी जर यूजरला स्ट्राँग नेट कनेक्शन देणारे आसपासचे वाय-फाय स्पॉट शोधून देऊ शकलो तर कंपनीचा ‘रिअल-टाईम इन्फॉर्मेशन शेअरिंग’चा व्यवसाय वाढेल हा विचार या फीचर मागे आहे. त्यामुळे मग लाईव्ह बातम्या, व्हायरल होऊ शकणारे व्हिडिओ फेसबुकला मिळतील. काही निवडक आयओएस यूजर्सना ही सुविधा देण्यात आली असून लवकर अँड्रॉईड यूजर्सना ती पुरवण्यात येण्याची शक्यता आहे. चला तर म्हणजे जास्तीत जास्त काळ यूजर्सना फेसबुकवर गुंतविण्यासाठी कंपनीने ही नामी शक्कल लढवली आहे.वाचा : ​फेसबुुकवर अनोळखी व्यक्ती त्रास देतोय ?वाचा : ​फेसबुकचे संदेश व्हॉटस अ‍ॅपला असे करा शेअर