मोदी झाले मेणाचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 20:20 IST2016-04-20T14:50:24+5:302016-04-20T20:20:24+5:30

जगप्रसिद्ध मॅडम तुसाद म्युझिअममध्ये जगातील निवडक व्यक्तिंचे मेणाचे पुतळे आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही या निवडक व्यक्तिंच्या यादीत सामील झाले.

Modi became wax! | मोदी झाले मेणाचे!

मोदी झाले मेणाचे!

cnxo
ldfiles/span> म्युझिअमने दिलेल्या माहितीनुसार, मोदींचा मेणाचा पुतळा साकारण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला. यावर सुमारे दीड कोटींचा खर्च आला. मोदींचा मेणाचा पुतळा त्यांच्या ट्रेडमार्क क्रीम रंगाचा चूडीदार कुर्ता आणि हाफ जॅकेटमध्ये दिसणार आहे. हात जोडलेल्या अभिवादन करीत असल्याच्या मुद्रेत ते आहे.  लंडनला जाण्याआधी हा पुतळा दिल्लीला पोहोचला तेव्हा तो मोदींना पाहिला. यावेळी त्यांनी मादाम तुसादच्या कारागीरांची मुक्तकंठे प्रशंसा केली. भगवान ब्रह्मासारखे या कलाकारांचे काम आहे. माझ्याच मेणाच्या पुतळ्याला भेटण्याची आजची संधी अविस्मरणीय आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Modi became wax!