मडोनाची उशिरा एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 05:27 IST2016-03-17T12:27:18+5:302016-03-17T05:27:18+5:30

पॉप स्टार मडोनाने आॅस्ट्रेलिया येथील ब्रिस्बेनमध्ये आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमात उशिरा हजेरी लावल्याने फॅन्सचा रोष ओढवून घ्यावा लागला.

Madonna's late entry | मडोनाची उशिरा एंट्री

मडोनाची उशिरा एंट्री

प स्टार मडोनाने आॅस्ट्रेलिया येथील ब्रिस्बेनमध्ये आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमात उशिरा हजेरी लावल्याने फॅन्सचा रोष ओढवून घ्यावा लागला. सुत्रानुसार ‘लाइक अ प्रेयर’ची गायिका असलेल्या मडोनाने ब्रिस्बेन इंटरटेनमेंट सेंटरच्या संगीत कार्यक्रमात स्टेजवर येण्यासाठी तब्बल तीन तास उशिर केला. वेळेनुसार तिला रात्री आठ वाजता येणे अपेक्षित होते, मात्र तिला स्टेजवर येण्यासाठी तीन तास उशिर झाला. या संपुर्ण प्रकारामुळे उपस्थित प्रेक्षक चांगलेच नाराज झाले. त्यांनी आयोजकांनी थेट घरी जाण्याचीच धमकी दिली. काही प्रेक्षकांनी तर लगेचच ट्विटरवर ‘मॅडोना तुझी वाट बघुन आम्ही घरी जात आहोत’ अशा आशयाचे ट्विटही केले.

Web Title: Madonna's late entry