लॅटिन सॉँगराइटर्स हॉल आॅफ फेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 21:52 IST2016-03-23T04:52:29+5:302016-03-22T21:52:29+5:30

पॉप स्टार शकीरा आणि जुआन्स यांचे नावे ‘लॅटिन सॉँगराइटर्स हॉल आॅफ फेम’साठी सुचविण्यात आले आहे.

Latin Songwriters Hall of Fame | लॅटिन सॉँगराइटर्स हॉल आॅफ फेम

लॅटिन सॉँगराइटर्स हॉल आॅफ फेम

प स्टार शकीरा आणि जुआन्स यांचे नावे ‘लॅटिन सॉँगराइटर्स हॉल आॅफ फेम’साठी सुचविण्यात आले आहे. बिलबोर्डनुसार कलाकारांच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळविलेल्या या दोन्ही स्टार्ससोबत मार्को एंटोनियो सोलिस, रूबेन ब्लेड्स आणि ड्रेको रोजा यांच्याही नावांचा समावेश आहे. तर संगीतकार काइक सॅँटेंडर, कालरेस लारा, चिको नवारो आणि अलेजेंड्रो जीन यांच्या नावावर देखील विचार केला जात आहे. सर्व निवडलेल्या कलाकार आणि संगीतकारांच्या नावांची अंतिम यादीची घोषणा पुढच्या महिन्यात फ्लोरिडाच्या मियामी बीचमध्ये ‘२०१६ लॅटिन बिलबोर्ड म्युझिक कॉफ्रेंस’च्या दरम्यान केली जाणार आहे. त्यानंतर १३ आॅक्टोबरच्या ‘फिलमोर मियामी बीच जॅकी ग्लीसन थिएटर’मध्ये चौथ्या वार्षिक ‘ला मूसा अवार्डस’ कार्यक्रमात त्यांचा सन्मान केला जाईल.

Web Title: Latin Songwriters Hall of Fame