​साहेबांपेक्षा भारतीयांना शेक्सपियर जवळचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 19:00 IST2016-04-20T13:30:30+5:302016-04-20T19:00:30+5:30

शेक्सपियर इंग्लंडपेक्षा भारत आणि ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांत अधिक प्रसिद्ध आहे.

Indians closer to Shakespeare than Saheb | ​साहेबांपेक्षा भारतीयांना शेक्सपियर जवळचा

​साहेबांपेक्षा भारतीयांना शेक्सपियर जवळचा

े शेक्सपियरचे साहित्य वाचले नसेल; परंतु त्याचे नाव परिचित नसलेला व्यक्ती तसा विरळच. असा हा महान इंग्लिश साहित्यकार मुळचा इंग्लंडचा. त्याने नाटके आणि कविता लिहिल्या इंग्रजीमध्ये.

पण एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, शेक्सपियर इंग्लंडपेक्षा भारत आणि ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांत अधिक प्रसिद्ध आहे.

शेक्सपियरच्या 400व्या जयंतीनिमित्त ब्रिटिश काऊन्सिलतर्फे ‘यूगोव्ह’ संस्थेने 15 देशांतील 18 हजार लोकांचे सर्वेक्षण केले. ‘आॅल द वर्ल्ड्स’ नावाच्या या सर्व्हेमध्ये 83 टक्के भारतीयांनी शेक्सपियर समजत असल्याचे मान्य केले तर इंग्लंडमध्ये केवळ 58 टक्के लोकांना त्याचे साहित्य उमजते.

इंग्लंडच्या 59 टक्क्यांच्या तुलनेत मेक्सिकोमध्ये 88 टक्के लोकांना शेक्सपियर आवडतो. 84 टक्के ब्राझिलियन्सना शेक्सपियरचे साहित्य आजच्या काळातही लागू पडते असे वाटते. इंग्लंडमध्ये हेच प्रमाण केवळ 57 टक्के आहे.

सर्व्हेक्षणात भाग घेतलेल्या एक तृतांशपेक्षा जास्त लोकांनी सांगितले की, शेक्सपियरमुळे त्यांचा इंग्लंडकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला आहे. यासंबंधी भारत (62 टक्के) व ब्राझील (57 टक्के) असे प्रमाण होते.

सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ब्रिटिश काऊन्सिलने असा निष्कर्ष काढला की, भारत, मेक्सिको, ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांमध्ये शेक्सपियरची वाढती लोकप्रियता येणाºया काळात इंग्लंडच्या स्थैर्य, भरभराट आणि प्रभावावर थेट परिणाम करणारा घटक बनू शकतो.

Web Title: Indians closer to Shakespeare than Saheb